ETV Bharat / entertainment

बीटीएस बॅन्डमधील साऊथ कोरियन सात मुलांची जादू जगात, जाणून घ्या विशेष गोष्टी... - SOUTH KOREAN BAND BTS

बीटीएस बॅन्ड हा जगभरात खूप लोकप्रिय आहे. आज आम्ही या बॅन्डबद्दल काही विशेष गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.

BTS band
बीटीएस बॅन्ड (instagram - bts.bighitofficial)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 23, 2025, 2:00 PM IST

मुंबई : गेल्या काही काळापासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या पॉप बॅन्ड बीटीएसनं आपल्या मेहनतीनं जग जिंकलं आहे. बीटीएस हा पहिला बॅन्ड बनला, जो फक्त साऊथ कोरियामध्येच नव्हे तर जगात खूप कमी वेळात लोकप्रिय बनला. दरम्यान बीटीएसची लोकप्रियता यावरून अंदाज लावता येते की, आज त्यांचे इंस्टाग्रामवर 75 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. याशिवाय यूट्यूबवर 75 दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर आहेत. बीटीएस चाहत्यांना बीटीएस आर्मी म्हणून ओळखले जाते. बीटीएस बॅन्डमधील सदस्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. बीटीएस बँडमध्ये एकूण 7 सदस्य आहेत.

बीटीएस बॅन्डमधील सदस्यांनी केला संघर्ष : बीटीएस बॅन्डला बैंगटन बॉयज असेही म्हणतात. 2010 मध्ये स्थापन झालेला साऊथ कोरियन बॉय बॅन्डमध्ये जिन, सुगा, जे-होप, आरएम, जी मिन, व्ही आणि जंगकूक हे सदस्य आहेत. हे स्टार्स गाण्याचं स्वत: लेखन करून सह-निर्मिती करतात. याशिवाय ते गाण्याबरोबर सुंदर डान्स करून प्रेक्षकांना मोहित करतात. हा बॅन्ड मानसिक आरोग्य, वयात येणे, शालेय वयातील तरुणांचे त्रास आणि प्रेमाकडे जाणारा प्रवास आणि प्रसिद्धी या विषयांवर गाणे लिहतात, त्यामुळे त्यांची गाणी ही खूप लोक्रप्रिय झाली आहेत. दरम्यान सुरुवातीच्या काळात बीटीएस बॅन्डमधील सदस्यांना सादरीकरणादरम्यान भेदभावाचा सामना करावा लागला होता. त्यांचा प्रवास हा खूप संघर्षानं भरलेला होता. सुरुवातीच्या काळात, बीटीएसमधील सातही सदस्य एकाच खोलीत एकत्र राहत होते. हा ग्रुप तिथेच डान्स आणि गाण्याचा सराव करत होता. या बॅन्डची लोकप्रियता कमी असल्यानं अनेकदा काही कार्यक्रमांमध्ये त्यांच्यावर दुर्लक्ष केले जात होते. आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. जर बीटीएसमधील कुठलाही सदस्य विमानतळावरून जात असल्याची बातमी समोर आली, तर त्यांना पाहण्यासाठी कॅमेरामॅनच्या रांग लागतात आणि त्यांचे फॅन्स देखील तिथे गोळा होतात.

व्हाईट हाऊसमध्ये मिळालं आमंत्रण : या बॅन्डला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी देखील व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं होतं, यावरून बीटीएसच्या यशाचा अंदाज लावता येईल. बीटीएसला तरुणांचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर देखील म्हटले जाते. या बॅन्डमधील सदस्य नेहमीच सकारात्मक राहण्याचा सल्ला देतात. बीटीएसला आतापर्यंत अनेक प्रतिष्ठित संगीत पुरस्कार मिळाले आहेत, यात एमटीव्ही म्युझिक अवॉर्ड्स, अमेरिकन म्युझिक अवॉर्ड्स, बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स, साउथ कोरिया मेलन म्युझिक अवॉर्ड्स, गोल्डन डिस्क अवॉर्ड्स आणि मामा अवॉर्ड्स, यांचा समावेश आहे. याशिवाय बीटीएस हा ग्रॅमीमध्ये सादरीकरण करणारा पहिला कोरियन बॅन्ड आहे.

बीटीएस बॅन्डमधील सात सदस्य

  • 1 किम नाम-जून उर्फ आरएम : बीटीएस बँन्डमधील पहिल्या सदस्याचं नाव आरएम आहे, ज्याचं कोरियन नाव किम नाम जून आहे. आरएम या बॅन्डचा लीडर आहे. दरम्यान आरएमनं एकदा एका मुलाखतीत सांगितलं होतं की, सुरुवातीला त्याला इंग्रजी येत नव्हती, मात्र त्यानं इंग्रजी शिकण्यासाठी 'फ्रेंड्स' नावाचा शो पाहिला होता.
  • 2 किम सेओक जिन उर्फ जिन : जिन हा बीटीएसचा दुसरा आणि वयानं सर्वात मोठा सदस्य आहे. त्याचं कोरियन नाव किम सेओक जिन आहे. सुरुवातीला जिनला अभिनेता आणि नर्तक व्हायचे होतं. मात्र यानंतर तो बीटीएसमध्ये सामील झाला. आता त्याला गाणी लिहायला आवडतात. तो अनेकदा स्वत:ला वर्ल्डवाइड हॅन्डसम असल्याचं म्हणत असतो.
  • 3 मिन यून गी उर्फ सुगा : सुगा हा बीटीएसचा तिसरा सदस्य आहे. सुगाचं कोरियन नाव मिन यून गी आहे. गाण्याव्यतिरिक्त, सुगा सुंदर रॅपर आणि डान्सर आहे.
  • 4 जंग हो सेओक उर्फ जे होप : जे होप हा बीटीएसचा चौथा सदस्य असून त्याचं कोरियन नाव जंग हो सेओक आहे. तो या ग्रुपमधील सर्वोत्तम डान्सर आहे. तोच टीममधील इतर सदस्यांना डान्सचं प्रशिक्षण देत असतो.
पार्क जी-मिन
Park Ji-min (पार्क जी-मिन -instagram)
  • 5 पार्क जी-मिन उर्फ जी मिन : जी मिन हा बीटीएसचा पाचवा सदस्य आहे. त्याचं कोरियन नाव पार्क जी-मिन आहे. तो सुद्धा उत्तम डान्स आणि गाणी म्हणतो. जी मिननं डान्सचे प्रशिक्षण घेतलं आहे.
  • 6 किम तेहयुंग उर्फ व्ही : व्ही हा बीटीएसचा सहावा सदस्य आहे. व्हिचं कोरियन नाव किम तेहयुंग आहे. 2016 मध्ये व्हिनं मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला होता. त्याला जगातील सर्वात आकर्षक पुरूषाचा किताब मिळाला आहे, 2019 ते 2024 पर्यंत त्याची जागा कोणीचं घेऊ शकलं नाही.
  • 7 जियोन जंग-कूक उर्फ जंग कूक : जंग कूक हा बीटीएसमध्ये सामील होणारा शेवटचा सदस्य आहे. त्याला स्केचिंग आणि फोटोग्राफीचा छंद आहे. तो ग्रुपमध्ये सर्वात लहान आहे. मात्र तो त्याच्या गायनानं आणि डान्सनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.