मुंबई : बायरामजी जीजीभॉय पारसी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन (बी.जे.पी.सी.आय.) च्या जीर्णोद्धाराला युनेस्को आशिया-पॅसिफिक पुरस्कार सांस्कृतिक वारसा संवर्धन २०२४ कडून 'अवॉर्ड ऑफ मेरिट'नं सन्मानित करण्यात आलं आहे. व्हर्चुसा फाउंडेशन शिक्षण, सक्षमीकरण आणि पर्यावरणाशी सुसंगत काम करत आहे. १३४ वर्षे जुन्या इमारतीचा जीर्णोद्धार करून व्हर्चुसा फाऊंडेशननं ऐतिहासिक वास्तू जतन केली आहे.
संवर्धन वास्तुविशारद विकास दिलावरी यांच्या नेतृत्वाखाली आणि व्हर्चुसा फाउंडेशनच्या पाठिंब्याने झालेल्या जीर्णोद्धारामुळे शाळेच्या गुंतागुंतीच्या वास्तुशिल्पीय वैशिष्ट्यांना पुनरुज्जीवित करण्यात आलं. यात सागवान लाकडावर केलेलं नक्षीकाम पडदे आणि रंगीत काचेचा समावेश आहे. प्रसिद्ध व्हिक्टोरियन वास्तुविशारद आणि अभियंता खान बहादूर मुंचरजी सी. मुरझबान यांनी शाळेची रचना केली. ही रचाना गॉथिक वास्तुशिल्प शैलीत बांधलेल्या मुंबईतील वास्तूंपैकी एक आहे. १८९० मध्ये बायरामजी जीजीभॉय यांनी स्थापन केलेल्या वास्तूच्या जीर्णोद्धारामुळे या वास्तूचं ऐतिहासिक महत्त्व जपलं गेलं आहे. १,५०० हून अधिक विद्यार्थ्यांना सेवा देणारा हा उपक्रम शाश्वत उपक्रमांद्वारे शिक्षणाला चालना देण्याचं काम करतो. (VIRTUSA FOUNDATION)
या जीर्णोद्धाराच्या प्रकल्पातून शिक्षण, सांस्कृतीचे जतन, भूतकाळ आणि भविष्यकाळात अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्याचा वस्तुपाठ दिला आहे. व्हर्चुसा कॉर्पोरेशनचे मुख्य वित्तीय अधिकारी अमित बजोरिया म्हणाले, “बी.जे.पी.सी.आय.ला युनेस्कोने दिलेली मान्यता ही, व्हर्चुसाच्या उद्देशपूर्ण अभियांत्रिकीच्या वचनबद्धतेचं एक उल्लेखनीय उदाहरण आहे. हा प्रकल्प शाश्वततेच्या तत्त्वांशी सुसंगत राहून वारसा जपल्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा आणि शिक्षित कसे करता येते हे दर्शवते. व्हर्चुसाच्या माध्यमातून चालवलेले उपक्रम हे आम्ही भविष्य सक्षम करणाऱ्या वारशांचे रक्षण करण्याचे एक साधन म्हणून पाहतो. या जीर्णोद्धाराच्या माध्यमातून आमचे शिक्षण, सांस्कृतीचे जतन आणि भूतकाळ आणि भविष्यकाळात अर्थपूर्ण संबंध निर्माण करणे याचे उदाहरण देतं.
बी.जे.पी.सी.आय. चे विश्वस्त रुस्तम एन.बी. म्हणाले, “हा प्रतिष्ठित युनेस्को पुरस्कार भावी पिढ्यांसाठी आपला सामायिक वारसा जपण्याचं महत्त्व मान्य करतो". व्हर्चुसा फाउंडेशनच्या पाठिंब्यानं बी.जे.पी.सी.आय. लवचिकता, उत्कृष्टता आणि शिक्षण आणि सांस्कृतिक जतनाच्या काळातील मूल्यांचे दीपस्तंभ म्हणून उभा आहे. हा सन्मान सांस्कृतिक वारसा आणि शैक्षणिक उत्कृष्टतेमध्ये नेतृत्वाचा वारसा पुढे नेण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देतो.”
२००० पासून सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया-पॅसिफिक अवॉर्डने २७ देशांमध्ये 900 हून अधिक प्रकल्पांना मान्यता दिली आहे. याच्या माध्यमातून वारसा जतन आणि नूतनीकरणाला प्रोत्साहन मिळते. बी.जे.पी.सी.आय.सह जीर्णोद्धाराच्या प्रकल्पाचा यात समावेश आहे. २००० पासून सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया-पॅसिफिकने २७ देशांमध्ये ९०० हून अधिक प्रकल्पांना मान्यता दिली आहे. याच्या माध्यमातून वारसा जतन आणि नूतनीकरणाला प्रोत्साहन मिळतं.
2024 मध्ये 'मेरिट पुरस्कार' प्राप्त करणारे इतर प्रकल्प :
• गुआनयिन हॉल टीहाऊस संवर्धन प्रकल्प, चेंगडू, सिचुआन प्रांत, चीन
• हेलौ पॅव्हेलियन संवर्धन प्रकल्प, शांघाय, चीन
• वेधशाळा टॉवर संवर्धन प्रकल्प, क्राइस्टचर्च, न्यूझीलंड
हेही वाचा :