मुंबई - चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा सध्या अडचणीत आहेत. अलीकडेच त्यांना चेक बाउन्स प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना 3 महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा आणि अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे. राम गोपाल वर्मा यांना मुंबईच्या अंधेरी कोर्टानं तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर आता त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. याप्रकरणी त्यांनी एक पोस्ट करून लिहिलं, 'माझ्या आणि अंधेरी न्यायालयाबद्दलच्या बातम्यांबाबत, मी हे स्पष्ट करू इच्छितो की, हा माझा माजी कर्मचाऱ्याशी संबंधित 2 लाख 38 हजार रुपयांचा 7 वर्षे जुना खटला आहे... माझा वकील हे प्रकरण पाहत आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्यानं, मी पुढे काहीही बोलू शकत नाही.'
राम गोपाल वर्मा झाली शिक्षा : चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांच्याविरुद्ध न्यायालयानं लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयानं राम गोपाल वर्मा यांना तीन महिन्यांत तक्रारदाराला 3 लाख 72 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. जर त्यांनी असं केलं नाही तर त्यांना तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा होईल. मंगळवारी 21 जानेवारी अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टात राम गोपाल वर्माच्या सात वर्षे जुन्या चेक बाउन्स प्रकरणाबद्दल निर्णय दिला. मात्र राम गोपाल वर्मा या खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात पोहोचले नाहीत. यानंतर परिस्थितीत न्यायालयानं त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं. राम गोपाल वर्मा यांना निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा कलम 138 अंतर्गत शिक्षा सुनावली आहे.
With regard to the news about me and Andheri court, I want to clarify that it is to do with a 7 year old case of Rs 2 lakh 38 thousand amount , relating to my ex-employee .. My advocates are attending to it. and since the matter is in court i cannot say anything further
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) January 23, 2025
संपूर्ण प्रकरण काय आहे? : 2018 मध्ये, 'श्री' नावाच्या कंपनीनं राम गोपाल वर्माच्या कंपनीविरुद्ध चेक बाउन्सचा खटला दाखल केला होता. यानंतर राम गोपाल वर्माच्या कंपनीवर आरोप करण्यात आला होता की, त्यांनी या कंपनीला त्यांचे पैसे दिले नाहीत. 'रंगीला',' सरकार' 'सत्या'सारखे चित्रपट बनवणारे राम गोपाल वर्मा गेल्या काही काळापासून बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकले नाही. त्यांना सध्या खूप आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे. कोरोना काळात आर्थिक संकटामुळे त्यांना त्यांचे कार्यालयही विकावे लागले होते. दरम्यान पुन्हा एकदा राम राम गोपाल वर्मा 'सिंडिकेट' चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
हेही वाचा :