मुंबई : लॉस एंजेलिसमधील विनाशकारी जंगलातील आगीमुळे 97व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावर परिणाम झाला होता. ऑस्कर 2025 साठी नामांकनांची घोषणा 23 जानेवारी रोजी होणार आहे. अकादमीचं सीईओ बिल क्रॅमर आणि अकादमीच्या अध्यक्षा जेनेट यांग यांनी एका निवेदनात याबद्दल पुष्टी केली आहे. 97व्या ऑस्कर पुरस्काराचे थेट प्रक्षेपण नेहमीप्रमाणे एबीसी हुलु लाइव टीवी, यूट्यूब टीवी, एटीएंडटी टीवी आणि फूबोटीवी प्लॅटफॉर्मवर होईल. या कार्यक्रमाला फ्रीमध्ये प्रेक्षक पाहू शकतात. हा कार्यक्रम सकाळी 7:00 वाजता EDT, दुपारी 4:00 वाजता PDT, सकाळी 11:00 वाजता GMT, संध्याकाळी 7:00 वाजता CST पाहिला मिळेल.
कुठे होणार कार्यक्रम : दरम्यान 97व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकन प्रक्रिया बोवेन यांग आणि रेचल सेनोट यांच्याकडून केली जाईल. तर ऑस्कर 2025चे सूत्रसंचालन विनोदी कलाकार कोनन कॉनन ओ'ब्रायन करणार आहेत. अकादमीचे सीईओ बिल क्रॅमर आणि अकादमीच्या अध्यक्षा जेनेट यांग यांनी याची घोषणा केली आहे. कोनन कॉनन पहिल्यांदाच ब्रॉडकास्ट शो होस्ट करणार आहे. 97व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा रविवार, 2 मार्च 2025 रोजी ओव्हेशन हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. तसेच या कार्यक्रमाला जगभरातील स्टार्स रेड कार्पेटवर त्यांचे ग्लॅमर दाखवताना दिसतील.
Meet this year’s #Oscars nominations hosts: Bowen Yang and Rachel Sennott.
— The Academy (@TheAcademy) January 21, 2025
Join us on Thursday, January 23rd, at 8:30 AM ET / 5:30 AM PT to see who is headed to the 97th Oscars. Stream on https://t.co/8Zw5mDf3tg, https://t.co/5fKuh0mVRV, ABC, Hulu, Disney+ or the Academy's… pic.twitter.com/9lmjLtTWll
Excited for #Oscars nominations tomorrow? Hold on, we got you.
— The Academy (@TheAcademy) January 23, 2025
Everywhere to watch the LIVE stream: https://t.co/OGDntiA2Hw
आगामी ऑस्कर कार्यक्रम
- गुरुवार, 23 जानेवारी 2025
ऑस्कर नामांकनांची घोषणा
- मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025
अंतिम वोटिंग सकाळी 9 वाजता PSTपासून सुरू होईल.
- मंगळवार, 18 फेब्रुवारी 2025
अंतिम मतदान संध्याकाळी 5 वाजता PSTवर संपेल.
- टीबीडी
तंत्रज्ञान पुरस्कार
- रविवार, 2 मार्च 2025
97वा ऑस्कर
2025 चे ऑस्कर पुरस्कार : अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसचे सीईओ बिल क्रॅमर आणि अध्यक्ष जेनेट यांग यांनी एका मीडिया रिलीजमध्ये पुष्टी केली आहे की, अकादमी पुरस्कार अजूनही 2 मार्च 2025 रोजीच आयोजित केला जाईल. हा सोहळा स्वप्नांचे शहर असलेल्या लॉस एंजेलिसला समर्पित केला जाणार आहे. आगामी ऑस्कर पुस्तकाराबद्दल आयोजकांनी पुढं सांगितलं, 'आम्ही लॉस एंजेलिसमधील घटनांवर चिंतन करू," तसेच, सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचे नामांकन थेट सादर केले जाणार नाहीत. त्याऐवजी गीतकारांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा वेळ वापरला जाईल.' आता हा कार्यक्रम खूप चर्चेत आहे.
हेही वाचा :