मुंबई - Kubera Poster out : साऊथ अभिनेता धनुष स्टारर चित्रपट 'कुबेर' घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. शेखर कममुला दिग्दर्शित हा चित्रपट 31 डिसेंबर 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. याआधी, गणेश चतुर्थीच्या शुभ दिवशी निर्मात्यांनी बहुप्रतीक्षित चित्रपटाचे पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरमध्ये धनुष आणि नागार्जुन अक्किनेनी वेगवेगळ्या अवतारात आहेत. या दोघेही विरुद्ध पात्रात असल्याचं दिसत आहेत. यात दोघांच्याही चेहऱ्यावर गांभीर्य आणि निर्भयता दिसून येत आहे. कुबेरच्या निर्मात्यांनी एक्सवर पोस्टर रिलीज केलं आहे. आता हे पोस्टर चाहत्यांना खूप आवडत आहे.
'कुबेर' चित्रपटामधील पोस्टर रिलीज : या पोस्टरवर अनेकजण लाईक आणि कमेंट्स करत आहेत. चाहते हे पोस्टर पाहून आनंदी आणि उत्साहित झाले आहेत. पोस्टरमध्ये धनुष पूर्ण दाढी आणि वाढलेल्या केसांसह एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. त्याच्या विचित्र दिसण्यानं सर्वांनाच प्रश्न पडला आहे की, या चित्रपटात त्याची काय भूमिका असेल. दुसरीकडे, नागार्जुन अक्किनेनी खूपच इंटेन्स लूकमध्ये दिसत आहे. 'कुबेर' चित्रपटात जिम सरभ, रश्मिका मंदान्ना, दलीप ताहिल यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं संगीत शेखर कममुला आणि देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केलं आहे. 'कुबेर'ची निर्मिती अमिगोस क्रिएशन्सनं केली आहे.