मुंबई -Katrina Kaif brand ambassador of CSK : आपीएल 2024 लवकरच सुरू होणार आहे. आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्सनं ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून अभिनेत्री कतरिना कैफची निवड केली असल्याचं समजतय. 'चेन्नई सुपर किंग्स'नं आपल्या जर्सीचा लोगोही बदलला आहे. कतरिना कैफ 'एतिहाद एअरवेज'ची देखील ब्रँड ॲम्बेसिडर आहे. 2023 मध्ये 'एतिहाद एअरवेज'नं कतरिनाच्या नावाची घोषीत करत, याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. चेन्नई सुपर किंग्जनं यूएईच्या राष्ट्रीय विमान कंपनी, 'एतिहाद एअरवेज सोबत प्रायोजकत्व करार केल्यानंतर कॅटला ॲम्बेसिडर बनविल्यानंतर याबद्दल सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि एतिहाद एअरवेज :'चेन्नई सुपर किंग्ज' 'एतिहाद एअरवेज'मध्ये करार झाल्यानंतर आता संघाच्या जर्सीवर यूएईच्या राष्ट्रीय विमान कंपनीचे नाव दिसेल. प्रायोजकत्व करारावर स्वाक्षरी करण्याबरोबरच चेन्नई सुपर किंग्जची नवीन जर्सी देखील लॉन्च करण्यात आली आहे. ही जर्सी लवकरच पाहायला मिळणार आहे. यावेळी जर्सीमध्ये कुठला बदल होईल याबद्दल अनेकांना उत्सुकता असेलचं, कारण अनेकांना 'चेन्नई सुपर किंग्ज' ही टीम आवडते.
कतरिना कैफचा चित्रपट : अलीकडे कतरिना कैफ 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटामुळे चर्चेत आली होती. मात्र तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. 'मेरी ख्रिसमस' श्रीराम राघवन दिग्दर्शित असून हा चित्रपट रहस्यमय आहे. 'मेरी ख्रिसमस' चित्रपट हिंदी आणि तमिळमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा रनटाईम 2 तास 24 मिनिट आहे.
कतरिना अनेक ब्रँडची ब्रँड ॲम्बेसिडर :कतरिना कैफने आणखी अनेक ब्रँड्सचे प्रमोशन केले आहे. 2017 मध्ये कतरिना 'लेन्सकार्ट'ची ब्रँड ॲम्बेसिडर होती. 2009 मध्ये ती 'पॅन्टीन' शैम्पूची ब्रँड ॲम्बेसिडर बनली होती. ती 'मेडिमिक्स', 'शुगर फ्री', 'इमामी', 'ट्रॉपिका'ना यांसारख्या अनेक ब्रँडशी जोडली गेली आहे. 2023 मध्ये 'एतिहाद'मध्ये सामील झाली. यापूर्वी तिचा 2010 मध्ये या एअरलाइनशी संबंध होता.