मुंबई - Kartik Aaryan :अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या आगामी 'भूल भुलैया 3' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतीच विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांची एन्ट्री या चित्रपटात झाली आहे. कार्तिक आर्यन पुन्हा एकदा या चित्रपटात 'रूह बाबा'ची भूमिका साकारून चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. आता या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. कार्तिक आर्यननं 'भूल भुलैया 3' मधील एका मिस्ट्री गर्लचा फोटो आज 21 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे हे तुम्ही ओळखू शकाल का? शेअर केलेल्या फोटोमध्ये या अभिनेत्रीचा अर्धा चेहरा दिसत आहे.
कार्तिकनं शेअर केला 'भूल भुलैया 3'मधील मिस्ट्री गर्लचा फोटो : हा फोटो शेअर करत कार्तिकनं लिहिले, ''भूल भुलैया'ची गुंतागुंत सोडवा, चित्रपटामधील मिस्ट्री गर्ल आणि दिवाली 2024.'' आता कार्तिकच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. अनेकांनी 'भूल भुलैया 3'ची ही मिस्ट्री गर्ल ओळखली आहे. कार्तिकच्या सर्व चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर रणबीर कपूर स्टारर ॲनिमल चित्रपटामधील अभिनेत्री तृप्ती दिमरीचं नाव घेत आहे. कार्तिकनं शेअर केलेल्या पोस्टरवरून तृप्ती दिमरीची एंट्री या चित्रपटात झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. कार्तिकच्या या पोस्टवर अनेकजण या चित्रपटाची प्रतीक्षा करत असल्याचं सांगत आहे.