लातूर : मनोहरराव गोमारे पुरोगामी विचार मंच लातूरच्या वतीनं अॅड. मनोहरराव गोमारे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अॅड. मनोहरराव गोमारे राष्ट्रीय पुरस्काराचं वितरण आणि व्याख्यान पार पडलं. या कार्यक्रमात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांना अॅड. मनोहरराव गोमारे राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. याच कार्यक्रमात योगेंद्र यादव यांचं ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हानं आणि भवितव्य’ या विषयावर व्याख्यान पार पडलं.
लोकशाही वाचवण्यासाठी योगदान द्यावं : लोकशाही वाचवण्याच्या कसोटीतील एक सामना हरला. परंतु, मालिका अद्याप शिल्लक आहे. मात्र लोकशाहीची हत्या लोकशाही माध्यमातूनच होत असल्याचं चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. भाारतीयांनी लोकशाहीच्या आव्हानांना सामोरं जाऊन लोकशाही वाचवण्यासाठी योगदान द्यावं, असं आवाहन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केलं. यावेळी अध्यक्षस्थानी माजी कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे होते. प्रमुख पाहूणे म्हणून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची उपस्थिती होती. विचार मंचावर अॅड. मनोहरराव गोमारे पुरोगामी विचार मंच लातूरचे समन्वयक प्रा. डॉ. नागोराव कुंभार, सुभाष लोमटे, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, डॉ. गणेश गोमारे यांची उपस्थिती होती.
लोकशाहीची हत्या : यावेळी योगेंद्र यादव यांनी जागतिक स्तरावर लोकशाहीसमोरील मोठ्या आव्हानाबद्दल चिंता व्यक्त केली. लोकशाहीची हत्या आपल्याच हत्यारांनी केल्याचं सांगत त्यांनी प्रसारमाध्यमावर निशाणा साधला. लातूर येथे 'भारतीय लोकशाहीचे आव्हान आणि भविष्य' या विषयावर व्याख्यान देताना यादव म्हणाले, "रस्त्यावरचे आंदोलन, सार्वजनिक आंदोलन आणि सांस्कृतिक लढा याद्वारे लोकशाही वाचवली जाऊ शकते."
जागतिक दृष्टीकोनातून विचार झाला पाहिजे : प्रसारमाध्यमांवर टीका करताना ते म्हणाले की, लोकशाहीसमोर दररोज नवनवीन आव्हाने येत आहेत. त्याला स्वत: पुरते न पाहता जागतिक दृष्टीकोनातून विचार झाला पाहिजे. त्यांनी माजी JNU विद्यार्थी उमर खालिदची अटक आणि जामीन नाकारणे हे अपमानजनक असल्याचं म्हटलं. 2020 च्या दिल्ली दंगलीशी आपला संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -