दिलजीत दोसांझनं एपी ढिल्लनच्या वक्तव्यावर दिली प्रतिक्रिया, आलं सत्य बाहेर - DILJIT DOSANJH
एपी ढिल्लननं दिलजीत दोसांझवर ब्लॉक केल्याच्या आरोप केला आहे. आता दिलजीतनं यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
By ETV Bharat Entertainment Team
Published : Dec 22, 2024, 3:16 PM IST
मुंबई : पंजाबी गायक एपी ढिल्लननं आपल्या म्यूजिक कॉन्सर्टमध्ये मोठा धमाल केला आहे. चंदीगडमध्ये नुकत्याच झालेल्या शोमध्ये एपीनं पंजाबी भाषेत संवाद साधला आणि प्रसिद्ध गायक दिलजीत दोसांझवर टीका केली. त्यानं स्टेजवर दिलजीतला इंस्टाग्रामवरून त्याला अनब्लॉक करण्यास सांगितलं. यानंतर एपीबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. इंदूरमधील त्याच्या कॉन्सर्टदरम्यान, गायक दिलजीतनं एपी ढिल्लन आणि करण औजला यांना भारतात त्यांचा शो करत असल्यानं शुभेच्छा दिल्या होत्या. आता एपीच्या बाजूनं ही तक्रार आली आहे, कि दिलजीतनं त्याला इंस्टाग्रामवरून ब्लॉक केलंय. याप्रकरणी आता दिलजीतनं देखील एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानं इंस्टाग्रामवर एपीच्या पोस्टला प्रतिक्रिया दिला आहे.
एपी ढिल्लननं दिलजीतची उडवली खिल्ली : दिलजीतनं आपल्या कॉन्सर्टदरम्यान एपी ढिल्लन आणि करण औजला हे भारतात शो करत असल्यामुळे तो खुश आहे असं सांगितलं होतं. त्यानं स्टेजवर त्यांचं अभिनंदन केलं होतं, यानंतर तो चर्चेत आला होता. दरम्यान याप्रकरणी एपीनं चंदीगडमध्ये उत्तर दिलं आहे. त्यानं शो दरम्यान म्हटलं, "मला फक्त एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे, पाजी, आधी मला इन्स्टाग्रामवरून अनब्लॉक करा आणि मग माझ्याशी बोला. पडद्यामागे काय चालले आहे, हे मी कोणालाही खर सांगत नाही. आधी मला अनब्लॉक करा मग आपण एकताबद्दल बोलू." एपीनं पुढं म्हटलं ''रियल वर्ल्डमध्ये जगा आणि फेक बनू नका." यानंतर एपीनं आपल्या फोनची स्क्रीन इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आणि सांगितलं की, त्याला दिलजीतपासून कसं ब्लॉक केलं गेलं आहे.
एपी ढिल्लनचा व्हिडिओ व्हायरल : दरम्यान एपी ढिल्लनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर दिलजीतही गप्प बसला नाही. त्यानं एपीची प्रोफाइल शेअर करत ब्लॉक केलं नसल्याचं सांगितलं. त्यानं देखील आपल्या फोनची स्क्रीन शेअर करताना लिहिलं, 'मी तुला कधीच ब्लॉक केले नाही, माझे पंगे सरकारबरोबर होऊ शकते कलाकारांसोबत नाही.' हे प्रकरण इथेच थांबले नाही आणि एपीनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक नोट लिहिली आहे, यात त्यानं लिहिलं, 'कोणाबद्दलही वाईट बोलण्याचा माझा कधीही हेतू नव्हता. मी काहीही बोलण्याचा विचार करत नव्हतो, कारण मला माहित होते की, प्रत्येकजण माझा तिरस्कार करेल. आम्हाला माहित आहे की काय खरे आहे आणि काय नाही.' आता या दोन्ही गायकांमधील मतभेद चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे.
हेही वाचा :