पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड हद्दीतून मोबाईल चोरी होणे, हरवणे, तसंच गहाळ होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळं पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष मोहीम राबवून चोरीच्या फोनचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार शहरात चोरी झालेले तब्बल 20 लाख रुपयांचे मोबाईल वाकड पोलिसांनी (Wakad Police) नागरिकांना परत मिळवून दिले आहेत.
विविध राज्यातून केले मोबाईल हस्तगत : वाकड पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. तर हरवलेले मोबाईल हे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात, तसंच बिहार, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश येथे ट्रेस झाले होते. त्या राज्यातून हे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आणि नागरिकांना परत दिले. त्यामुळं आपला मोबाईल परत मिळाल्याचा आनंद मोबाईल धारकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. यावेळी मोबाईल मालकांनी पोलिसांचे आभार मानले.
मोबाईल ही काळाची गरज : वाकड पोलीस ठाणे येथे शोधलेल्या मोबाईलचा वितरण समारंभ पार पडला. यावेळी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड म्हणाले की, आजच्या आधुनिक काळात मोबाईल ही चैनीची वस्तू न राहता गरजेची वस्तू झाली आहे. दैनंदिन व्यवहारात संपर्क करण्यासाठी, करमणुकीसाठी, फोटो काढण्यासाठी मोबाईलचा अविरतपणे वापर होत असतो. मोबाईलबाबत प्रत्येक व्यक्ती खूप संवेदनशील आहे. मोबाईल हरवला, चोरी झाला अथवा गहाळ झाल्यास संबधित व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये मदती करता येते. यासाठी विशेष मोहीम राबवत आम्ही 20 लाख किंमतीचे तब्बल १२० मोबाईल हस्तगत केले आहेत. त्याचबरोबर मोबाईल चोरीला जाणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
हेही वाचा -