मुंबई Karthik Aaryan :बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 3'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच त्यानं सांगितलं की, चित्रपट निर्माता अनीस बज्मीनं त्याच्यावर तलवार ठेवली होती, यामागचं कारण अतिशय मजेशीर आहे. कार्तिकनं त्याच्या अधिकृत इंन्स्टाग्राम स्टोरीजवर अनीस बज्मीचा एक मोनोक्रोम फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो तलवार हातात घेऊन बसला आहे. हा फोटो त्याच्या आगामी 'भूल भुलैया 3' या चित्रपटाच्या सेटवरून घेतलेला आहे. अनीस यांच्या हातात तलवार धरण्याचं कारण सांगताना कार्तिकनं गंमतीनं लिहिलं की, "15 तास झाले सर, मला घरी जाऊ द्या."
'भूल भुलैया 3' चित्रपटाबद्दल :कार्तिक अनेकदा 'भूल भुलैया 3' चित्रपटाच्या सेटवरील काही झलक त्याच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असतो. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित, विद्या बालन, राजपाल यादव, विजय राज, संजय मिश्रा, अश्विनी काळसेकर, राजेश शर्मा आणि इतर कलाकार देखील आहेत. या चित्रपटाची निर्मिती टी-सीरीज, ए ए फिल्म्स आणि सिने वन स्टुडिओ करत आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. आता कार्तिकचे चाहते या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहात आहेत.