महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'कांगुवा'मधील 'फायर' गाणं अखेर सूर्याच्या वाढदिवसानिमित्त रिलीज, पाहा व्हिडिओ - Kanguva movie - KANGUVA MOVIE

Fire Song from Kanguva : सूर्या स्टारर 'कांगुवा'मधील फायर गाणं अखेर त्याच्या वाढदिवसाला रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याला संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिलं असू हे गाणं खूप दमदार असल्याचं दिसत आहे.

Fire Song from Kanguva
कांगुवामधील फायर गाणं ('कांगुवा'मधील 'फायर' रिलीज (SONG POSTER))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 23, 2024, 5:55 PM IST

मुंबई - Fire Song from Kanguva Movie :तामिळ सुपरस्टार सूर्याच्या वाढदिवसानिमित्त, ग्रीन स्टुडिओनं आज, 23 जुलै रोजी त्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'कांगुवा' मधील पहिलं गाणं 'फायर' रिलीज केलं आहे. गाणं रिलीज होताच आता या चित्रपटाबाबत उत्सुकता आणखीनच वाढली आहे. 'फायर' या गाण्यात 'कांगुवा' मधील सूर्याचे पात्र उत्तम प्रकारे मांडण्यात आलं आहे. निर्माते या गाण्याला सिंहाची गर्जना आणि आगीचे वादळ यांचे मिश्रण म्हणत आहेत. 'कांगुवा' हा चित्रपट खूप दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटामधील हे गाणं खूप प्रभावी आहे. 'फायर' गाण्याला संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिलंय. यापूर्वी त्यांनी 'पुष्पा' चित्रपटाला देखील संगीत दिलं होतं.

'कांगुवा' चित्रपटामधील 'फायर' गाणं रिलीज :या गाण्याला बी प्राक यांनी त्याचा दमदार आवाज दिला आहे. स्टुडिओ ग्रीन निर्मित 'कांगुवा' हा या वर्षातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. 350 कोटींपेक्षा जास्त बजेट असलेल्या या चित्रपटात सूर्याची जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग भारतातील सात विविध प्रदेशांमध्ये करण्यात आलं आहे. हॉलिवूडच्या ॲक्शन आणि सिनेमॅटोग्राफीच्या तज्ज्ञांनी हा चित्रपट भव्य बनवला आहे. 'कांगुवा' चित्रपटात दमदार व्हिज्युअल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे यामधील प्रचंड युद्ध दृश्य असणार आहेत.

'कांगुवा' चित्रपटात प्रचंड युद्ध दृश्य : 'कांगुवा' चित्रपटात युद्ध दृश्यामध्ये 10000 पेक्षा जास्त कलाकार दिसणार आहेत. उत्तम नियोजन आणि व्यवस्थापन चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आता अनेकजण 'कांगुवा' चित्रपट पाहण्यास उत्सुक आहेत.'कांगुवा' जगभरात प्रदर्शित झाला पाहिजे यासाठी स्टुडिओ ग्रीननं शीर्ष वितरकांबरोबर काम केलं आहे. 10 ऑक्टोबर 2024 रोजी रिलीज होणारा हा चित्रपट प्रेक्षकांचं खूप मनोरंजन करेल असं दिसत आहे. जसजशी रिलीजची तारीख जवळ येत आहे, तसतसे चाहते आणि चित्रपट प्रेमी सुर्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details