मुंबई - 'कंगना राणौत'च्या खूप गाजावाजा झालेल्या 'इमर्जन्सी' चित्रपटाला पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमी प्रतिसाद मिळाला आहे. खरं तर, आतापर्यंतच्या तिच्या चित्रपटातील सर्वात कमी ओपनिंग देणारा हा सिनेमा ठरला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तीन वर्षांनी १७ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. पंजाबमध्ये शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीनं सिनेमाला विरोध केल्यानं या राज्यात हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही.
'इमर्जन्सी' चित्रपटाचं कंगना पहिल्यांदाच स्वतंत्रपणे दिग्दर्शन करत असल्यामुळे तिला स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठं आव्हान तिच्यासमोर होतं. प्रेक्षकांना थिएटरमध्ये आकर्षित करण्याचंही आव्हान तिच्यासाठी आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबरोबरच ती अभिनयही करत आहे. शिवाय तिच्या मणिकर्णिका फिल्म्स बॅनरनं हा सिनेमा झी स्टुडिओजसह बनवला आहे. कंगनानं आधीच दावा केला आहे की, तिनं या प्रोजेक्टसाठी तिच्या सर्व वैयक्तिक मालमत्ता पणाला लावल्या आहेत. तिला हा चित्रपट पडद्यावर आणण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे.
'इमर्जन्सी' बॉक्स ऑफिस कलेक्शनचा पहिला दिवस -'इमर्जन्सी' चित्रपटानं पहिल्या दिवशी अंदाजे २.४ कोटी रुपये कमावले असल्याचं फिल्म इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्क यांनी सुरुवातीच्या अंदाजातून सांगितलं आहे. या राजकीय नाट्यमय चित्रपटात कंगना रणौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट २५०० स्क्रीनवर राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची स्पर्धा अजय देवगणचा पुतण्या अमान देवगण आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानी यांच्या 'आझाद'शी आहे.
'इमर्जन्सी' ची संथ गतीनं सुरुवात -'इमर्जन्सी' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली नसली तरी, 'तेजस' आणि 'थलाईवी' सारख्या कंगनाच्या काही सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या चित्रपटांपेक्षा तो किंचित चांगला राहिला आहे. कंगनानं सातत्यानं सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला कलाकारांचा दावा कायम ठेवला आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत तिच्या नशिबानं तिला बॉक्स ऑफिसवर चांगली साथ दिलेली नाही.
ऑक्युपन्सी -'इमर्जन्सी' ची पहिल्या दिवशी एकूण ऑक्युपन्सी केवळ १९.२६% इतकी होती, मुंबईत ४६७ शो आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ६५७ शो सुरू होते. त्या तुलनेत, कंगनाच्या मागील 'थलाईवी' (२०२१) आणि 'धाकड' या चित्रपटांना आणखी कमी ओपनिंग मिळालं होतं, 'धाकड' चित्रपटानं पहिल्या दिवशी फक्त ५० लाख रुपयांची कमाई केली होती. तिची भूमिका असलेल्या 'तेजस'नंही १.२५ कोटी रुपयांची कमकुवत सुरुवात केली होती.