मुंबई - Kalki 2898 AD Movie : अभिनेता प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हासन स्टारर 'कल्की 2898 एडी' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केली. मोठ्या पडद्यावर धमाल केल्यानंतर आता हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटीवर पाहायला मिळेल. 22 ऑगस्ट रोजी मध्यरात्री ओटीटीवर चित्रपटाचा टीझर रिलीज करून निर्मात्यांनी चाहत्यांना आश्चर्यचकित केलं होतं. 'कल्की 2898 एडी'ची हिंदी आवृत्ती नेटफ्लिक्स इंडियावर प्रसारित झाली आहे. चित्रपटाच्या तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड आवृत्त्या प्राइम व्हिडिओ इंडियावर उपलब्ध आहेत. 'कल्की 2898 एडी'ची क्रेझ पाहता हा चित्रपट दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आला आहे.
'कल्की 2898 एडी' चित्रपट ओटीटीवर प्रसारित : 'कल्की 2898 एडी'नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 1100 रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 750 कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटामधील प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन आणि दिशा पटानी यांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला. 'कल्की 2898 एडी' चित्रपटामध्ये दुल्कर सलमान, विजय देवरकोंडा, मृणाल ठाकूर, एस. एस. राजामौली, राम गोपाल वर्मा आणि के. व्ही. अनुदीप यांनी यांनी कॅमियो केला आहे. 600 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'कल्की 2898 एडी'ची निर्मिती वैजयंती मुव्हीजनं केली आहे. हा चित्रपट यावर्षी 27 जून रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 2024 मधील सर्वात जास्त कमाई करणार चित्रपट ठरला.