महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कल्की 2898 एडी: अमिताभ बच्चन यांनी मागितली प्रभासच्या चाहत्यांची माफी, जाणून घ्या कारण - Amitabh Bachchan Seeks Apology

Amitabh Bachchan Seeks Apology : 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट 27 जून 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. रिलीज होण्याच्या काही दिवस आधी, प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांची भूमिका असलेल्या चित्रपटाचे निर्माते यांनी स्टार्सची व्हिडिओ मुलाखत शेअर केली. यामध्ये अमिताभ बच्चन प्रभासच्या चाहत्यांची माफी मागताना दिसतात.

Kalki 2898 AD
कल्की 2898 एडी (Kalki 2898 AD Poster)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 4:10 PM IST

मुंबई - Amitabh Bachchan Seeks Apology : नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी'च्या आगाऊ बुकिंगला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रभासची लोकप्रियता पाहता अनेक शो झपाट्याने हाऊसफुल्ल होत आहेत. आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या X सोशल मीडिया हँडलवर भव्या स्टार कास्टचा समावेश असलेली एक मनोरंजक मुलाखत पोस्ट केली आहे. या मुलाखतीदरम्यान अमिताभ बच्चन यांनी प्रभासच्या फॉलोअर्सची माफी मागितली.

प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हासन, अमिताभ बच्चन आणि निर्माते स्वप्ना आणि प्रियांका दत्त यांची विशेष मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. व्हिडिओमध्ये बच्चन म्हणतात, "जेव्हा नाग ( गिग्दर्शक नाग अश्विन ) या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्याकडे आला, तेव्हा त्यानं मला फक्त माझं पात्र आणि प्रभास कसा दिसतील याचं चित्र दाखवले. आणि यामध्ये मी 'द प्रभास'ला हादरा देणारा हा अवाढव्य माणूस दिसत होतो."

"कृपया मला माफ करा, प्रभासच्या चाहत्यांनो. मी हात जोडून माफी मागतो. चित्रपटात मी काय करतो ते पाहून मला मारू नका," असं म्हणत अमिताभ यांनी चित्रपटाबद्दल सांगितलं. बिग बी चित्रपटातील त्यांच्या आणि प्रभासमधील युद्धाच्या दृश्यांचा संदर्भ देत बोलत आहेत, हे ट्रेलर पाहून आपल्याला लक्षात येईल. 'कल्की 2898 एडी' या पौराणिक साय-फाय एंटरटेनरमध्ये प्रभास आणि अमिताभ बच्चन एकमेकांसमोर उभे ठाकले असून त्यंच्यातला संघर्ष पाहायला मिळतो.

कमल हासनलाही या चित्रपटाचा एक भाग असल्याबद्दल त्याला सर्वात जास्त कौतुक वाटले. त्यानं स्पष्ट केलं, "हे कॅमेऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या संख्येबद्दल नाही. मी सेटच्या शांततेचं सर्वात जास्त कौतुक केलं कारण बहुतेक सेटमध्ये ते नसते. आवाज एखाद्या व्यक्तीच्या आत आणि थिएटरमध्ये असावा, सेटवर नाही. प्रत्येकजण शिस्तबद्ध पद्धतीने बोलत होता. मिस्टर नागी (नाग अश्विन) त्याच्या नेहमीच्या शांत आवाजात बोलू बोलतो आणि तरीही ते ऐकले जाऊ शकतं."

'कल्की 2898 एडी' चित्रपट 27 जून 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे आणि त्याच्या रिलीजच्या काही दिवस आधी, निर्मात्यांनी मथुरा येथील भगवान कृष्णाच्या जन्मस्थानी चित्रपटाची संगीत थीम लॉन्च करण्याची योजना आखली आहे. 24 जून रोजी कल्कीच्या थीमचे लॉन्चिंग केलं जाणार आहे.

हेही वाचा -

  1. 'कल्की 2898 एडी'ची ॲडव्हान्स बुकिंग सुरू, रिलीजपूर्वी भारतात 6 कोटीची केली कमाई - kalki 2898 ad
  2. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नानंतर मद्यधुंद हनी सिंगनं झहीर इक्बालला दिला इशारा - HONEY SINGH
  3. सीमा भागातील प्रेक्षकांनी 'गाभ' चित्रपट पाहावा यासाठी मराठी हॉटेल व्यावसायिकाचा अनोखा उपक्रम - Marathi movie Gabh

ABOUT THE AUTHOR

...view details