ETV Bharat / bharat

पासपोर्टसाठी जन्माचा दाखला म्हणून आधार कार्ड द्याल, तर बसेल फटका; जाणून घ्या कोणतं प्रमाणपत्र आहे अधिकृत - BIRTH CERTIFICATE MANDATORY

पासपोर्ट सादर करताना अनेकजण जन्माचा दाखला म्हणून आधारकार्ड देतात. मात्र आधार कार्ड हा जन्माचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येत नसल्यानं अनेकांचे अर्ज बाद होतात.

Passport Applications
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2024, 1:51 PM IST

हैदराबाद : नागरिकांना पासपोर्ट काढताना जन्माचा दाखला म्हणून विविध कागदपत्राची पुर्तता करावी लागते. मात्र जन्माचा दाखला म्हणून काहीजण आधार कार्ड जोडतात. दरम्यान जन्माचा दाखला म्हणून आधार कार्ड जोडल्यास त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. आधार कार्ड हा जन्माचा दाखला म्हणून स्वीकारला जात नाही. त्यामुळे अर्ज बाद करण्यात येतो. आवश्यक कागदपत्रं पुन्हा सबमिट केल्यानंतरही अर्जदारांना एक आठवडा ते दहा दिवस गमवावे लागतात. परिणामी, त्यांना त्यांच्या पासपोर्टसाठी प्रतीक्षा करावी लागते.

हैदराबादमध्ये दररोज नाकारले जातात 200 अर्ज : हैदराबादमधील पाच पासपोर्ट सेवा केंद्रे आणि 14 पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्रांवर एकत्रितपणे दररोज 3 हजार 800 पासपोर्ट जारी करतात. यामध्ये जवळजवळ 200 अर्ज अपूर्ण किंवा अवैध कागदपत्रांमुळे नाकारले जातात. अधिकारी अधिकृत वेबसाइट passportindia.gov.in वर अर्ज करण्यापूर्वी सल्लागार विभागात अर्जाबाबत आवश्यकतांचं पुनरावलोकन करण्याच्या सूचना देतात. प्रथम वेळचा अर्ज पुन्हा जारी करणं, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (पीसीसी) आणि डिप्लोमॅटिक पासपोर्टसाठी कागदपत्रं सबमिट करण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वांबाबत सूचना करण्यात येतात.

निवासी पुराव्यासाठी कोणता लागतात कागदपत्रं

राहण्याचा पुरावा म्हणून अर्जदार खालीलपैकी कोणतंही एक प्रमाणपत्र सादर करू शकतात.

* वीज, टेलिफोन किंवा पोस्टपेड मोबाईल बील

* आयकर पावती

* निवडणूक आयोगाचे ओळखपत्र

* गॅस कनेक्शन पुरावा

* जोडीदाराच्या पासपोर्टची प्रत (लागू असल्यास).

* अल्पवयीन मुलांसाठी पालकांच्या पासपोर्टची प्रत

*आधार कार्ड.

* भाडे करार.

* बँक पासबुक

जन्माच्या पुराव्यासाठी कागदपत्रं

नियमित पासपोर्ट अर्जांसाठी खालील आठ कागदपत्रांपैकी कोणतंही एक सबमिट केलं जाऊ शकते.

* जन्म आणि मृत्यू निबंधक किंवा महानगरपालिकेचं प्रमाणपत्र

* दहावीचं प्रमाणपत्र

* सरकारी जीवन विमा कंपन्यांद्वारे जारी केलेला पॉलिसी बाँड

* सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवा रेकॉर्ड प्रत, किंवा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वेतन/पेन्शन ऑर्डर

* निवडणूक ओळखपत्र

* पॅन कार्ड

* ड्रायव्हिंग लायसन्स.

तत्काळ अर्जांसाठी : अर्जदारांनी तीन प्रमाणपत्रं सादर करणं आवश्यक आहे. तर नियमित पासपोर्ट अर्जांसाठी दोन प्रमाणपत्रं आवश्यक आहेत. सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करुनचं पासपोर्ट अर्ज सादर करण्यात येऊ शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.