मुंबई : साउथ सिनेसृष्टीतील अभिनेत्री कीर्ती सुरेशनं 12 डिसेंबर रोजी बॉयफ्रेंड अँटोनी थाटीलबरोबर गोव्यात लग्न केलं. कीर्तीच्या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि काही साऊथ स्टार्स उपस्थित होते. लग्नानंतर कीर्तीनं तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले, ज्यावर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स करून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता. आता कीर्ती लग्नानंतर पहिल्यांदाच मीडियासमोर आली आहे. ती सध्या तिच्या आगामी चित्रपट 'बेबी जॉन'मुळे चर्चेत आहे. कीर्ती 'बेबी जॉन'च्या प्रमोशन कार्यक्रमात दिसली. या कार्यक्रमात वरुण धवन आणि चित्रपटाची टीमही उपस्थित होती.
'बेबी जॉन'च्या प्रमोशनमध्ये कीर्ती सुरेश : कीर्ती सुरेश 'बेबी जॉन'च्या प्रमोशन कार्यक्रमात काल रात्री मुंबईत लाल रंगाच्या वन-पीस ड्रेसमध्ये दिसली. यावर तिनं लांब मंगळसूत्र घातलं होतं. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. आता कीर्तीचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात तिला अनेकजण लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. याशिवाय पापाराझीनं देखील तिला लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 'बेबी जॉन'च्या प्रमोशनदरम्यान वरुणनं कीर्ती सुरेशकडे बोट दाखवत म्हटलं, 'ही वधू आहे.' या प्रमोशन कार्यक्रमात चित्रपटाची स्टार कास्ट वामिका गब्बी, कीर्ती सुरेश आणि वरुण धवन यांनी प्रश्नोत्तराच्या सत्रानंतर स्टेजवर एकत्र खूप मजा केली.
कीर्तीनं लग्नामधील थलपथी विजयबरोबरचा फोटो केला शेअर : कलिश दिग्दर्शित 'बेबी जॉन' चित्रपटाची निर्मिती 'जवान' दिग्दर्शक अॅटलीनं केली आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान कीर्तीच्या लग्नामध्ये थलपथी विजय आल्याचा दिसला. विजयबरोबरचा कीर्तीनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'जेव्हा तुमचा ड्रीम आयकॉन तुमच्या लग्नात तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येतो.' यानंतर या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या. कीर्तीचं लग्न खूप शाही पद्धतीनं गोव्यात केलं गेलं. दरम्यान कीर्तीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पुढं ती तामिळ चित्रपट 'कन्निवेदी' आणि 'रेंडु जेला सीता' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :