महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'देवरा : पार्ट 1' चित्रपटाबद्दल बोलताना जूनियर एनटीआर भावूक - JR NTR video vira - JR NTR VIDEO VIRA

Devara Part 1 : 'देवरा : पार्ट 1' चित्रपटाबद्दल बोलताना एनटीआर ज्युनियर हा भावूक झाला. त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Devara Part 1
देवरा : पार्ट 1

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 9, 2024, 5:16 PM IST

मुंबई - Devara Part 1 : 'देवरा : पार्ट 1' हा चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची वाट चाहते आतुरतेने पाहात आहेत. 'देवरा : पार्ट 1' चित्रपटामध्ये ज्युनियर एनटीआर व्यतिरिक्त सैफ अली खान आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटामध्ये ज्युनियर एनटीआरचे अनेक ॲक्शन सीन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'देवरा : पार्ट 1' चित्रपटाचं दिग्दर्शन कोरतल्ला शिवा यांनी केलंय. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान अलीकडेच, हैदराबादमधील एका कार्यक्रमात, एनटीआर ज्युनियर 'देवरा: पार्ट 1' या चित्रपटाबद्दल सांगताना भावूक झाला.

'देवरा'बद्दल बोलताना ज्युनियर एनटीआर झाला भावूक :'देवरा'बद्दल बोलताना त्यानं म्हटलं, ''मी तुम्हाला वचन देतो की, 'देवरा' चित्रपटाची वाट पाहणं हे सार्थक असेल. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर माझे चाहते गर्वानं आपली कॉलर उंच करणार.'' दरम्यान, ज्युनियर एनटीआरनं नुकतेच गोव्यात चित्रपटासाठी एक गाणे शूट केले आहे. यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांन पडद्यामागील काही फोटो शेअर केले होते. याशिवाय जान्हवी देखील तिच्या सोशल मीडियावर काही शूटमधील फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले होते. या फोटोमध्ये गोव्यामधील सुंदर नैसर्गिक दृश्य दिसत होते. ज्युनियर एनटीआरला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. याआधी त्याचा राम चरणबरोबरचा 'आरआरआर' रुपेरी पडद्यावर जबरदस्त हिट झाला होता.

ज्युनियर एनटीआरचं वर्कफ्रंट : दरम्यान 2016 च्या हिट 'जनथा गॅरेज'नंतर ज्युनियर एनटीआरचा चित्रपट निर्माते कोरतल्ला शिवाबरोबरचा दुसरा मोठा सहयोग चित्रपट आहे. हा चित्रपट अनेकांना आवडला होता. 'देवरा' चित्रपटाचे दोन भागात प्रदर्शित होणार आहे. 'देवरा' चित्रपटाचा पहिला भाग या वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे जान्हवीनं साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. दरम्यान ज्युनियर वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'एनटीआर 31'मध्ये दिसणार आहे. याशिवाय पुढं तो 'वॉर 2'मध्ये हृतिक रोशनबरोबर असणार आहे. हा चित्रपट त्याचा सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे.

हेही वाचा :

  1. 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची रिलीज डेट पुढे ढकलली ; अक्षयसह टायगरनं शेअर केला व्हिडिओ - bade miyan chote miyan release date
  2. माधुरी दीक्षितlसह रितेश देशमुखनं गुढीपाडव्याच्या दिल्या शुभेच्छा, व्हिडिओ व्हायरल - MADHURI DIXIT AND RITEISH DESHMUKH
  3. 'रामायण' चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी रणबीर कपूरचा फिटनेस प्रशिक्षण घेतानाचा व्हिडिओ व्हायरल - ranbir kapoor fitness training

ABOUT THE AUTHOR

...view details