मुंबई - Jolly LLB 3 : अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी सध्या त्यांच्या आगामी 'जॉली एलएलबी 3' या चित्रपटाच्या शूटिंगमुळे चर्चेत आहेत. 'जॉली एलएलबी' फ्रँचायझीचा हा तिसरा चित्रपट असून धमाकेदार असणार आहे. दरम्यान, खिलाडी कुमारनं 'जॉली एलएलबी 3' च्या शूटिंगबाबत एक नवीन अपडेट शेअर केली आहे. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत कथित रक्तानं भिजलेले अक्षय कुमार आणि अर्शद वारसी दुचाकीवरून जाताना दिसत आहेत. 'जॉली एलएलबी 3' नुकताच कायदेशीर अडचणीत अडकला होता. या चित्रपटात वकील आणि न्यायाधीशांची खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात आला होता.
'जॉली एलएलबी 3'चं राजस्थानमधील शुटिंग पूर्ण :दरम्यान अक्षय कुमारनं 'जॉली एलएलबी 3' शूटिंगबाबत एक अपडेट शेअर केली आहे. अक्षयनं पोस्ट शेअर करून सांगितलं की, "राजस्थान शेड्यूलचे शूटिंग संपलं आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी व्हायरल होणार हा व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये अर्शद आणि अक्षय हेल्मेट न घालता उभे राहून दुचाकी चालवत आहे . याशिवाय त्याच्या अंगावर रक्त दिसत आहे. पोस्ट शेअर करताना अक्षयनं लिहिलं, "दोन्ही जॉलींनी राजस्थानमध्ये चांगला वेळ घालवला." अक्षय कुमार आणि अर्शद वारसी व्यतिरिक्त 'जॉली एलएलबी 3'मध्ये सौरभ शुक्ला आणि हुमा कुरेशीदेखील दिसणार आहेत.
अक्षय कुमार आणि अर्शद वारसीचे आगामी चित्रपट : 'जॉली एलएलबी' फ्रँचायझीमधील पहिला भाग हा 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये अर्शदच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट अनेकांना आवडला होता. यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग 2017 मध्ये रिलीज झाला होता. यात अक्षय हा जॉली नावाच्या वकीलाच्या भूमिकेत दिसला होता. दरम्यान 'जॉली एलएलबी 3'च्या रिलीजची डेट अद्यापही समोर आलेली नाही. दरम्यान अक्षय आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो 'धूम 4', 'हाऊसफुल्ल 5', 'राऊडी राठौर 2', 'खेल खेल में', 'सिंघम अगेन', 'वेलकम टू द जंगल', 'मल्हार, 'स्काय फोर्स', 'कन्नप्पा' आणि 'सरफिरा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे अर्शद हा 'वेलकम टू द जंगल'मध्ये दिसणार आहे.
अक्षय कुमारनं केली गावातील मुलींना मदत : विजयनगरजवळील देवमाली मसुदा या गावात 'जॉली एलएलबी 3'च्या शूटिंगसाठी आलेल्या अक्षय कुमारनं गावातील 500 मुलींच्या सुकन्या समृद्धी खात्यात पैसे जमा करण्याची घोषणा केली आहे. 0 ते 10 वर्षे वयोगटातील मुलींसाठी खाते उघडले जाईल. प्रत्येक मुलीच्या खात्यात एकदा 1000 रुपये जमा केले जातील. 'जॉली एलएलबी 3' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षयनं ही घोषणा केली. या संवादादरम्यान अक्षय कुमारनं सांगितलं की, "गावात मुलींच्या शिक्षणाचा अभाव आहे. यावेळी मुलींना शिक्षित करण्यात यावे." 'जॉली एलएलबी 3'च्या शूटिंगसाठी गावात आलेल्या अक्षय कुमारचे देवमाळीच्या ग्रामस्थांनी स्वागत केलं होतं.
हेही वाचा :
- 'चंदू चॅम्पियन'चे ग्वाल्हेरमध्ये ढोल-ताशांच्या गजरात स्वागत, कार्तिक आर्यनच्या गावात होणार ट्रेलर लॉन्च - Chandu Champion and Kartik Aaryan
- "भारतीय म्हणून कर्तव्य पार पाडूया": शाहरुख खानचं बोटांवर शाई लावण्याचं मतदारांना केलं आवाहन - Shah Rukh Khan
- "भारतीय म्हणून कर्तव्य पार पाडूया": शाहरुख खानचं बोटांवर शाई लावण्याचं मतदारांना केलं आवाहन - Shah Rukh Khan