महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

जोक्विन फिनिक्स आणि लेडी गागा स्टारर 'जोकर 2'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - Joker 2 trailer out - JOKER 2 TRAILER OUT

Joker 2 Trailer OUT : 'जोकर 2'चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा सीक्वेल तब्बल पाच वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Joker 2 Trailer OUT
जोकर 2 ट्रेलर रिलीज

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 12:12 PM IST

मुंबई- Joker 2 Trailer OUT:मोस्ट अवेटेड अमेरिकन म्युझिकल सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट 'जोकर 2'चा ट्रेलर आज 10 एप्रिल रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा सीक्वेल तब्बल पाच वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जोक्विन फिनिक्स पुन्हा एकदा आपल्या व्यक्तिरेखेद्वारे लोकांना एका नव्या जगाची कल्पना देण्यासाठी येत आहे. यावेळी त्याच्याबरोबर लेडी गागाही दिसणार आहे. टॉड फिलिप्स दिग्दर्शित 'जोकर 2' हा चित्रपट चालू वर्षातच प्रदर्शित होईल. 'जोकर 2'च्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे.

'जोकर 2' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज :निर्मात्यांनी 'जोकर 2'चा ट्रेलर शेअर करताना पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ''आता तो एकटा नाही, 'जोकर: फोली ए ड्यूक्स' 4 अक्टूबर 2024 रोजी थिएटरमध्ये येत आहे.'' ट्रेलरची सुरुवात जोक्विन फिनिक्स पात्र आर्थर फ्लेक (जोकर) पासून होते, जो तुरुंगात शिक्षा भोगत असतो. त्यानंतर तो हार्लीला भेटतो आणि स्वत:च्या जगात त्याच्या आवडीनुसार आयुष्य जगू लागतो. यावेळी देखील या चित्रपटाची कहाणी हटके असणार आहे. त्यामुळे अनेकजण हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे. जोक्विन फिनिक्स आणि लेडी गागा एकत्र दिसल्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट मेजवानीपेक्षा कमी नसेल.

'जोकर 2' चित्रपटाची स्टार कास्ट : 'जोकर 2' चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल बोलायचं झालं तर, जोक्विन फिनिक्स आणि लेडी गागा व्यतिरिक्त, यात ब्रेंडन ग्लीसन, कॅथरीना कीनर, जेकब लोफ्लँड आणि हॅरी लॉटी देखील आहेत. 'जोकर 2' हा चित्रपट दिग्दर्शक टॉड फिलिप्स यांनी स्कॉट सिल्व्हरबरोबर लिहिला आहे. या चित्रपटाला हिल्दुर गुडनाडोटीर यांनी संगीत दिलंय. 2019मध्ये आलेला 'जोकर'नं चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दरम्यान जोक्विन फिनिक्स शेवटी 2022मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नेपोलियन' या चित्रपटामध्ये व्हेनेसा किर्बीबरोबर दिसला होता. आता पुन्हा एकदा तो रुपेरी पडद्यावर आपली जादू दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे.

हेही वाचा :

  1. "सारी दुनिया जला देंगे", म्हणत अनंत अंबानींच्या बर्थडे पार्टीत सलमान खान झाला सामील - Salman Khan Joins B Praak
  2. अंकिता लोखंडे 'आम्रपाली' वेब सीरीजमध्ये दिसणार, निर्मात्यांनी केलं पोस्टर शेअर - ANKITA LOKHANDE
  3. 'हिरामंडी'त संधी दिल्याबद्दल फरदीन खाननं मानले संजय लीला भन्साळींचे आभार - Fardeen khan and Heeramandi

ABOUT THE AUTHOR

...view details