मुंबई - Kareena Kapoor High Court issue : हिंदी चित्रपटसृष्टीची सुंदर अभिनेत्री करीना कपूरला मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे. हे प्रकरण तिच्या गरोदरपणावर लिहिलेल्या पुस्तकाशी संबंधित आहे. पुस्तकाच्या शीर्षकात धर्मग्रंथाचं नाव वापरल्याबद्दल एका व्यक्तीनं तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या संदर्भात त्या व्यक्तीनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याआधी अतिरिक्त सत्र न्यायालयानं या प्रकरणी याचिका फेटाळली होती, त्यानंतर ॲडव्होकेट ख्रिस्तोफर अँथनी यांनी या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. आता उच्च न्यायालयानं करीना कपूरला नोटीस बजावली असून सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितलं आहे.
करीना कपूर खानला उच्च न्यायालयानं बजावली नोटीस : याचिकाकर्त्यानं समुदायाविशेषाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. करीना कपूरने तिच्या पुस्तकाच्या शीर्षकात धर्मग्रंंथाचं नाव वापरून समुदायाविशेषाच्या भावना दुखावल्याबद्दल करीना कपूरविरुद्ध एफआयआर करावी असं या याचिकेत लिहिलं गेलं आहे. करीना कपूर खान व्यतिरिक्त, अॅमेझॉन ऑनलाईन शॉपिंग आणि जगरनॉट बुक्स पुस्तकाचे सह-लेखक आहेत. या प्रकरणी अँथनी यांनी आधी जबलपूरच्या स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्यावर अँथनीनं मॅजिस्ट्रेट कोर्टात जाऊन खासगी तक्रार दाखल केली आहे.