मुंबई - Virat kohli And Anushka sharma :क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे जोडपे सध्या पालक झाल्यामुळे चर्चेत आहे. अनुष्का अनेकदा विराटला चिअरअप करण्यासाठी त्याचे क्रिकेट सामने पाहायला जात असते. मात्र, सध्या अनुष्का तिच्या बाळाची काळजी घेण्यात व्यग्र आहे. काल 25 मार्च रोजी विराट कोहलीनं शानदार खेळी करत आरसीबीला विजय मिळवून दिला. आता या विजयापेक्षा विराट वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आपल्या पत्नीबरोबर फोनवर बोलताना दिसत आहे.
सामना जिंकल्यानंतर विराट अनुष्काबरोबर बोलला : सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीनं मैदानातून व्हिडीओ कॉलवर पत्नी अनुष्का शर्मा, मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांच्याशी संवाद साधला. विराटच्या संभाषणाची झलक कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या संभाषणादरम्यान तो अतिशय क्यूट पद्धतीनं बोलताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूप आकर्षक होते. या व्हिडिओमध्ये तो पत्नी आणि आपल्या मुलांशी बोलताना, हसताना दिसत आहे. आता विराटच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याचा हा व्हिडिओ युजर्सला खूप आवडला आहे.