मुंबई - International Dance Day 2024 : 'इंटरनॅशनल डान्स डे' दरवर्षी 29 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा विशेष दिवस साजरा करण्याचा उद्देश नृत्य कलेचा प्रसार करणे हा आहे. नृत्य जादूगार जॉर्जेस नोव्हरे यांच्या स्मरणार्थ 'इंटरनॅशनल डान्स डे' साजरा केला जातो. जॉर्जेस नोव्हेरे हे प्रसिद्ध बॅले डान्सर होते. 29 एप्रिल 1727 रोजी जॉर्जेस नोव्हरे यांचे निधन झाले. 1982 मध्ये आंतरराष्ट्रीय रंगमंच संस्थेनं हा दिवस साजरा केला. तेव्हापासून आतापर्यत जॉर्जेस नोव्हरे यांच्या स्मरणार्थ 'इंटरनॅशनल डान्स डे' साजरा केला जात आहे. दरम्यान या विशेष दिनानिमित्त अभिनेता शाहिद कपूरसह अनेक बॉलिवूड स्टार्सनी चाहत्यांना 'इंटरनॅशनल डान्स डे'च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
'इंटरनॅशनल डान्स डे' : शाहिद कपूरनं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टेजवर डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यानं लिहिलं, 'फीट ऑन द बीट...' 'इंटरनॅशनल डान्स डे' या व्हिडिओमध्ये शाहिद कपूर स्वत:च्या स्वॅगमध्ये डान्स करताना दिसत आहे. दरम्यान अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीनंदेखील त्याचा डान्स करत असताना व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. या क्लिपमध्ये, जॅकी त्याची पत्नी रकुल प्रीत सिंगबरोबर डान्सचा आनंद घेत आहे. हा व्हिडिओ शेअर करत जॅकीनं लिहिलं, 'लाइफ एक डान्स फ्लोअर आहे, त्यामुळे तुमचे आवडते गाणे वाजवा आणि मग त्यावर डान्स करा..' 'इंटरनॅशनल डान्स डे' जॅकीनं शेअर केलेला हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे.