ETV Bharat / entertainment

प्रेग्नंट आथिया शेट्टीसह केएल राहुलचे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील फोटो, बाळाच्या स्वागतासाठी उत्साही दांपत्य - KL RAHUL WITH ATHIYA SHETTY

आथिया शेट्टी आणि केएल राहुल पालक बनणार असून अलीकडेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान त्यांनी केलेल्या डेटचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

KL Rahul, Athiya Shetty (Photo/instagram/@klrahul)KL
केएल राहुल आणि अथिया शेट्टी ((Photo/instagram/@klrahul/ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 13, 2025, 5:24 PM IST

मुंबई - केएल राहुल आणि अथिया शेट्टी आपल्या पहिल्या बाळाची प्रतीक्षा करत आहेत. त्यांनी त्यांच्या अलिकडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील काही फोटो शेअर केल्यानं चाहत्यांना आनंदा झाला आहे. केएलनं सोमवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर २०२४-२५ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान पत्नीसह काही वेळ निवांत घालवला.

पहिल्या फोटोमध्ये, केएल रस्त्याच्या कडेला असलेल्या कॅफेमध्ये कॉफीचा आनंद घेत असल्याचं दिसतं. दुसऱ्या फोटोमध्ये दोन कप कॉफी आणि एक ब्राउनी दिसत आहे. यामध्ये तो आथियासह एक आरामदायक डेट करत असल्याचे संकेत मिळत आहेत. आणखी काही फोटोत तो घरासमोर उभा दिसत आहे. एका फोटोत तो कारमध्ये जाताना दिसतो. तर एका सुंगर समुद्रकिनारी त्यांनी वेळ घालवल्याचं इतर काही फोटोतून दिसतंय.

या फोटोमधील अखेरच्या फोटोत तो रसत्यालगतच्या एका कॅफेमध्ये बसल्याचं दिसतंय. अथियानं स्वेटर आणि सैलसर राखाडी रंगाची पँट घातली आहे. ती ड्रिंकचा आनंद घेत असल्याचं दिसतंय, तर राहुल तिच्या बेबी बंपचे प्रेमाने कौतुक करत असताना तिच्यावरून नजर हटवू शकलेला नाही.

नोव्हेंबर २०२४ मध्ये या जोडप्यानं आपण आई बाबा होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर दोघांच्याही चाहत्यांचा आणि कुटुंबीयांच्या आनंदाला भरतं आलं होतं. केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी २३ जानेवारी २०२३ रोजी खंडाळा येथील सुनील शेट्टीच्या फार्महाऊसमध्ये एका समारंभात लग्न केलं. मोजक्या मित्रांसह कुंटुंबीयांनी या समारंभाला हजेरी लावली होती.

राहुलनं अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० वर्षे पूर्ण केली आहेत. केएल राहुलनं २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. कसोटी पदार्पणाच्या दोन वर्षांनंतर, राहुलने २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या सामन्यात त्यानं शेवटच्या चेंडूवर षटकार मारून पहिल्यांदा शतक झळकवलं होतं. राहुल हा पदार्पणातच एकदिवसीय शतक करणारा पहिला आणि एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याच दौऱ्यावर त्याने टी२० मध्ये पदार्पण केलं. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये सर्वात जलद शतक झळकवणारा फलंदाज आहे.अनेकदा त्याची तुलना राहुल द्रवीडशी केली जाते. तर २०१५ मध्ये 'हिरो' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी अथिया शेट्टी 'मुबारकां' आणि 'मोतीचूर चकनाचूर' सारख्या चित्रपटांमध्येही दिसली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.