महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

हृतिक रोशन बनला भारतातील सर्वात श्रीमंत स्टार किड, तपशील येथे पाहा... - HRITHIK ROSHAN

भारतातील सर्वात श्रीमंत स्टार किड्सचा अहवाल समोर आला आहे, यामध्ये अभिनेता हृतिक रोशनचं नाव आघाडीवर आहे.

Hrithik Roshan
हृतिक रोशन (हृतिक रोशन (ANI-Canva))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 22, 2024, 5:30 PM IST

मुंबई : निर्माते राकेश रोशन यांचा मुलगा अभिनेता हृतिक रोशननं एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. सध्या हृतिक रोशन हा भारतातील सर्वात श्रीमंत 'स्टार किड' असल्याचं समजत आहे. त्यानं सलमान खान आणि आमिर खानसारख्या फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार्सला देखील मागं टाकलं आहे. एका रिपोर्टनुसार, हृतिक रोशनची एकूण संपत्ती 3100 कोटी रुपये ($370 दशलक्षपेक्षा जास्त) आहे, यामुळे राम चरण (1340 कोटी), सैफ अली खान (1200 कोटी), आलिया भट्ट (550 कोटी), ज्युनियर एनटीआर (500 कोटी) त्याच्या मागे आहे. याशिवाय हृतिक अभिषेक बच्चन, रणबीर कपूर (400 कोटी), प्रभास (300 कोटी) यांच्यापेक्षाही पुढं आहे. हृतिकच्या आश्चर्यकारक नेट वर्थनं देशातील काही टॉप स्टार्सच्या नेट वर्थलाही मागं टाकलंय. यामध्ये आमिर खान (1800 कोटी), रजनीकांत (400 कोटी) आणि सलमान खान (2900 कोटी) यांच्या नावांचा देखील समावेश आहेत.

भारतातील लोकप्रिय स्टार किड्सची नेट वर्थ

हृतिक रोशन 3100 कोटी

सलमान खान (2900 कोटी)

आमिर खान (1800 कोटी)

सैफ अली खान (1200 कोटी)

आलिया भट्ट (550 कोटी)

रणबीर कपूर (400 कोटी)

अभिषेक बच्चन (400 कोटी)

हृतिक रोशनची एकूण संपत्ती :रिपोर्ट्सनुसार, भारतातील सर्वात श्रीमंत स्टार किड्समध्ये हृतिक रोशनचे नाव सामील झाल्यानंतर त्याचे चाहते खुश आहेत. हृतिक रोशनची एकूण संपत्ती 3100 कोटी रुपये आहे, ज्याचे श्रेय त्याच्या वाढत्या फिटनेस ब्रँड एचआरएक्सला जाते, ज्याची किंमत 1,000 कोटी रुपये आहे. याशिवाय अभिनय आणि नृत्य कौशल्यांसह, हृतिकचे काही व्यवसाय यात सामील आहेत. याव्यतिरिक्त हृतिक रोशनचं नाव भारतातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीत समाविष्ट आहे. तो भारतातील तिसरा सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी आहेत. टॉप 5च्या यादीत सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्या नावाच्या समावेश नाही. दरम्यान हृतिकच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'फायटर' या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोणबरोबर दिसला होता. आता पुढं तो 'क्रिश 4' आणि 'वॉर 2' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'वॉर 2' च्या शूटिंगसाठी हृतिक रोशन कियारा अडवाणी इटलीत, सेटवरील व्हिडिओ झाले लीक - war 2
  2. हृतिक रोशननं गर्लफ्रेंड सबा आझादबरोबर बाप्पाची केली आरती, ब्रेकअपच्या अफवांना लागला पूर्णविराम - HRITHIK and Saba video viral
  3. हृतिक रोशन आणि सबा आझादनं घेतला फिल्म डेटिंगचा आनंद, घातला ब्रेकअपच्या अटकळींना आळा - Hrithik Roshan and Saba Azad

ABOUT THE AUTHOR

...view details