मुंबई - Hina khan : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री हिना खान सध्या कठीण टप्प्यातून जात आहे. हिनानं नुकतीच माहिती शेअर करत कॅन्सर झाल्याचं सांगितलं होत. ही बातमी समोर आल्यापासून हिनाच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिला स्तनाचा कर्करोग झाल्याचं सांगण्यात आलं होतं. या काळात ती स्वतःची काळजी घेण्यात व्यग्र आहे आणि तिला प्रत्येक अडचणीला हसतमुखानं सामोरं जावं लागत आहे. ती प्रत्येक अपडेट मोठ्या हिंमतीनं आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत आहे.
हिना खानचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालनं शेअर केले फोटो :आता या कठीण काळात हिनाची आई आणि बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल तिची विशेष काळजी घेत आहे. अलीकडेच, तिच्या बॉयफ्रेंडनं हिनासाठी एक खास पोस्ट केली शेअर केली होती. या फोटोमध्ये हिनानं पिवळ्या नाईटसूटवर निळा एप्रन घातला आहे. सोफ्यावर बसलेली हिना खान खूपच क्यूट दिसत आहे. हा फोटो शेअर करताना, तिच्या बॉयफ्रेंडनं एक सुंदर कॅप्शन देत लिहिलं, "जेव्हा ती हसते तेव्हा प्रकाश अधिक उजळतो, जेव्हा ती माझ्याबरोबर असते तेव्हा मी आणखी जगतो. जेव्हा मी तिच्याबरोबर असतो, तेव्हा काहीही महत्त्वाचे नसते." ही पोस्ट पाहिल्यानंतर रॉकीचे किती प्रेम तिच्यावर आहे हे दिसून येतं.