महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सोनाक्षी सिन्हाच्या नखरेल अदांनी सजलेलं 'हीरामंडी'तील 'तिलस्मी बहीन' गाणं लॉन्च - Heeramandi Song launch - HEERAMANDI SONG LAUNCH

Heeramandi Song Tilasmi Bahein Out : संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' चित्रपटातील नवं गाणं नुकतंच लॉन्च झालं आहे. सोनाक्षी सिन्हावर चित्रीत झालेलं हे मदहोश करणारं गाणं तिच्या दिलखेचक अदांनी आणि नखऱ्यांनी मोहून टाकणारं आहे. मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी आणि इतर कलाकार असलेल्या 'हीरामंडी: द डायमंड बझार' या नेटफ्लिक्स मालिकेचा प्रीमियर १ मे रोजी होणार आहे.

Heeramandi Song Tilasmi Bahein Out
'तिलस्मी बहीन' गाणं लॉन्च

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 2:22 PM IST

मुंबई - Heeramandi Song Tilasmi Bahein Out : सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, अदिती राव हैदरी, मनीषा कोईराला, शर्मीन सेगल आणि संजीदा शेख अशा आघाडीच्या अभिनेत्रींची मध्यवर्ती भूमिका असलेला महिला केंद्रीत 'हीरामंडी: द डायमंड बझार' ही मालिका बहुप्रतीक्षित आहे. पहिल्या गाण्याला मिळालेल्या अमाप यशानंतर संजय लीला भन्साळींच्या नेटफ्लिक्स मालिकेचं "तिलस्मी बहीन" हे गाणं नुकतंच लॉन्च झालंय. आगामी मालिकेतील या गाण्याचं संगीत स्वतः संजय लीला भन्साळी यांनी दिलंय. शर्मिष्ठा चटर्जी यांनी गायलेलं हे गाणं एएम तुराझ यांनी रचले असून कृती महेश यांनी याचं नृत्यदिग्दर्शन केलंय. गाणं रिलीज झाल्यानंतर काही क्षणातच याला प्रेक्षकांनी लाईक्सचा वर्षाव सुरू झाल्याचं दिसतंय.

'हीरामंडी: द डायमंड बझार' या आगामी वेब सीरिजचे निर्माते मालिकेचे प्रसारण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आता या मालिकेतील दुसरं गाणं प्रेक्षकांना मोहून टाकणारं आहे. या गाण्यातील सोनाक्षी सिन्हाचं नृत्य, तिच्या चेहऱ्यावरील अदा, रोमारोमांत भरलेला नखरा याचं उत्तम दर्शन कोरिओग्राफीतून दिसलं आहे. शर्मिष्ठा चटर्जींचा आवाजातील ठसका गाण्याला एका उंचीवर नेणारा आहे.

संजय लीला भन्साळी यांच नावं आशयघन, कलात्मक चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून आदरानं घेतलं जात. त्यांनी आजवर 'हम दिल दे चुके सनम', 'ब्लॅक', 'राम-लीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'देवदास', 'सावरिया' आणि 'गंगूबाई काठियावाडी' सारख्या दर्जोदार चित्रपटांच्या निर्मितीनं हे सिद्ध केलंय. त्यामुळे 'हीरामंडी' या त्यांच्या आगामी मालिकेच्या प्रदर्शनाची प्रेक्षक खूप आतुरतेनं वाट पाहात आहेत.

संगीत हा देखील संजय लीला भन्साळी यांच्या प्रतीभेचा साक्षात्कार आहे. त्यांनी आता "भंसाली म्युझिक" हे नवीन म्यूझिक लेबल लॉन्च करुन नवी संगीतमय भेट दिली आहे. आगामी काळात प्रतिभावान संगीतकार आणि कलाकारांना घेऊन उत्तम संगीत आणि अल्बमची निर्मिती करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. 'हीरामंडी: द डायमंड बझार' या मालिकेचा प्रीमियर १ मे रोजी होणार आहे.

हेही वाचा -

  1. मिस वर्ल्ड २०२४ च्या मंचावर संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी'चे पहिले गाणे होणार लॉन्च
  2. "हिरामंडी माझा सर्वात मोठा प्रोजेक्ट पाहून मीही झालो आश्चर्यचकित" : संजय लीला भन्साळी
  3. भन्साळींच्या 'हीरामंडी'मध्ये झळकणार मनिषा कोईराला आणि मुमताज? फोटो व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details