महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

हीरामंडीचे सकल बन गाणे : अमीर खुसरोंच्या कवितेला भन्साळींच्या संगीतानं दिले पुनर्जिवन

Heeramandi Song Sakal Ban: संजय लीला भन्साळी यांच्या ओटीटी पदार्पणातील भव्य मालिका 'हीरामंडी'तील 'सकल बन' हे पहिले गीत आता रिलीज झालं आहे. भन्साळींच्या नवीन लॉन्च करण्यात आलेल्या 'भन्साळी म्युझिक' अंतर्गत बनलेलं हे पहिलेच गाणं आहे.

Heeramandi Song Sakal Ban
'हीरामंडी'चे पहिले गाणे लॉन्च

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 4:52 PM IST

मुंबई - Heeramandi Song Sakal Ban: 'हीरामंडी'च्या निर्मात्यांनी शनिवारी आगामी भव्य मालिकेतील 'सकल बन' या पहिल्या गाण्याचे लॉन्चिंग केलं आहे. हे गाणे चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांनी नव्यानं सुरू केलेल्या भन्साळी म्यूझिकच्या वतीने तयार झाले असून या कंपनीचे हे पहिलेच गाणे असेल. आगामी 'हीरामंडी' या वेब सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, आदिती राव हैदरी, मनीषा कोईराला, शर्मीन सेगल आणि संजीदा शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

एप्रिलमध्ये नेटफ्लिक्सवर प्रवाहित होणार असलेल्या या मालिकेतून संजय लीला भन्साळी ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. या मालिकेतील 'सकल बन' हे पहिले गाणे अमीर खुसरो यांच्या कवितेवर आधारित आहे आणि विशेष म्हणजे स्वत: संजय लीला भन्साळींनी संगीतबद्ध केले आहे आणि राजा हसन यांनी गायले आहे. हे गीत मनीषा, सोनाक्षी, अदिती आणि रिचा यांच्यासह स्टार-स्टडेड कलाकार असलेल्या 'हीरामंडी'च्या जगाची झलक दाखवते.

भन्साळी म्युझिकच्या माध्यमातून, दिग्दर्शकाने प्रतिभावान संगीतकार आणि कलाकारांना घेऊन सर्वोत्कृष्ट संगीत रचना तयार करण्याचे ठरवले आहे. संगीताची आवड व्यक्त करताना भन्साळी म्हणाले, "संगीतामुळे मला खूप आनंद आणि शांती मिळते. संगीत माझ्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग आहे. मी आता माझे स्वतःचे संगीत लेबल "भंसाली म्युझिक" लाँच करत आहे. संगीत ऐकताना एक आध्यात्मिक अनुभूती मला मिळत असते हाच अनुभव मिळवा यासाठी मी प्रेक्षकांना शुभेच्छा देतो."

बॉलिवूडमधील त्यांच्या भव्य दिव्य चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या भन्साळी यांनी अनेकदा त्यांच्या प्रकल्पांसाठी संगीतकाराची भूमिका बजावली आहे. 'गंगूबाई काठियावाडी'तील 'मेरी जान' आणि 'पद्मावत'मधील 'घूमर' यांसारखी गाणी चित्रपटाच्या कथानकाला साजेशी आणि पारंपारिक भारतीय संगीताचे उत्तम मिश्रण आहेत.

याशिवाय, मिस वर्ल्ड फिनालेमध्ये हे 'सकल बन' गाणे एका जागतिक प्लॅटफॉर्म लॉन्च होणार आहे. पहिल्यांदाच एखादे गाणे अशा प्रतिष्ठित मंचावर पदार्पण करेल. ९ मार्च रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणारा हा कार्यक्रम जगभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा -

  1. सारा अली खान स्टारर 'ए वतन मेरे वतन' चित्रपटामधील 'कतरा कतरा' गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ
  2. मिस वर्ल्ड २०२४ च्या मंचावर संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी'चे पहिले गाणे होणार लॉन्च
  3. 'भूल भुलैया 3'ची शूटिंग सुरू; कार्तिक आर्यन देवापुढे नतमस्तक

ABOUT THE AUTHOR

...view details