मुंबई- सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सोमवारी शोले स्टाईल आंदोलन केल्यानंतर सरकारला जाग आली आहे. राज्य सरकारनं सोमवारी एसआयटीत मोठे फेरबदल केले आहेत. नव्या एसआयटीमध्ये बीडचा एकही पोलीस अधिकारी नाही, अशी माहिती भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी माध्यमांना दिली.
भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हटले, " 1 तारखेला एसआयटी स्थापन करण्यात आली होती. समितीमधील काही व्यक्तींचा थेट धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे एसआयटीमधील बीडच्या सर्व पोलिसांना काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित फाईल मागविली होती. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी नवीन एसआयटीला मान्यता दिली आहे. नवीन एसआयटी बसवराज तेलींच्या अध्यक्षतेखालीच असणार आहे. पण, त्यात ९ ऐवजी 6 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असणार आहेत. या एसआयटीमध्ये एकही बीडचे पोलीस अधिकारी नाहीत".
#WATCH | Mumbai | BJP leader Dhas Suresh says " a new sit has been formed after the family raised questions on some people of the earlier sit which was headed by basavaraj teli and 9 other people were part of it. the current sit will have 6 people headed by basavaraj teli. no… https://t.co/bd6lt4mCfb pic.twitter.com/HXwnnW1IQV
— ANI (@ANI) January 13, 2025
- या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एसआयटीमधून वगळले- विजयसिंग जोनवाल, महेश विघ्ने, आनंद शंकर शिंदे, तुळशीराम जगताप, मनोज वाघ, चंद्रकांत एस. काळकुटे, बाळासाहेब अहंकारे आणि संतोष गित्ते यांना एसआयटीमधून वगळण्यात आलं आहे.
- नवीन एसआयटीमध्ये कोण असणार?सीआयडीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (छत्रपती संभाजीनगर) किरण पाटील हे तेली यांच्या देखरेखीखाली संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करणार आहेत. नव्या एसआयटीमध्ये बीड सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर, बीडचे सीआयडी निरीक्षक सुभाष मुठे, सीआयडी फ्लाइंग स्क्वॉडचे निरीक्षक अक्षय कुमार ठिकाणे तसेच सीआयडीच्या पोलीस हवालदार शर्मिला साळुंखे आणि दिपाली पवार यांचा समावेश आहे.
- बीड जिल्ह्यात पवनचक्की प्रकल्प चालवणाऱ्या एका ऊर्जा कंपनीवर खंडणीचा प्रयत्न रोखणाऱ्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर विधानसभेत बीडच्या आमदारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते.
२८ मे च्या FIR ची चौकशी झाली का ?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 13, 2025
हे तेव्हाच थांबलं असते तर संतोष देशमुखांनी प्राण गमावले नसते
२८ मे २०२४ रोजी ह्याच आवदा कंपनीच्या सुनील केदू शिंदे यांनी FIR फाइल केला होता. सेक्शन्स खालील प्रमाणे
१. IPC ३६५ एखाद्या व्यक्तीचे अपहरण किंवा अपहरण करून गुपचूप आणि चुकीच्या… pic.twitter.com/ru60PA0NS9
तर संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नवीन एसआयटीचे स्वागत केलं आहे. वाल्मिक कराडवर मोक्का लावावा, अशी त्यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत मागणी केली आहे. पवनचक्की कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक गुंडांविरोधात पोलिसात 28 मे 2024 रोजी तक्रार दाखल केल्याची पोस्ट दमानिया यांनी केली. या गुन्ह्यासंदर्भात कारवाई झाली असती तर संतोष देशमुख यांनी प्राण गमाविले नसते. यामागे राजकीय दबाव नाही का? याला धनंजय मुंडे जबाबदार नाहीत का, असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.
हेही वाचा-