प्रयागराज : मकर संक्रांतीच्या दिवशी महाकुंभ मेळाव्यात ( Mahakumbh 2025 ) पहिले अमृत स्नान आहे. मकर संक्रातीच्या शुभ मुहूर्तावर स्नान करण्याकरिता रात्रीपासूनच लाखो भाविक कुंभमेळाव्यात दाखल झाले. पहाटेपासून भाविकांनी संगम स्नानाला सुरुवात झाली. महाकुंभ मेळाव्यात सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. महाकुंभ मेळाव्यामुळे १२ किमीच्या परिघात असलेल्या सर्व घाटांवर मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे.
श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी आणि श्री शंभू पंचायती अटल आखाडा हे पहिले अमृत स्नान करणार आहेत. जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद म्हणाले, "सात शैव आखाडे प्रथम पवित्र स्नान करणार आहेत. त्यानंतर तीन वैष्णव आखाडे स्नान करणार आहेत. महाकुंभ मेळावा दर 12 वर्षांनी भारतातील चार ठिकाणी आयोजित केला जातो. यंदा महाकुंभ मेळावा 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार आहे.
- मुंबईतील भाविक अलका डडवाल म्हणाल्या , "एकतेत विविधता आहे. देशभरातून लोक महाकुंभमेळ्याला भेट देण्याकरिता आले आहेत. मला येथे येऊन खूप छान वाटत आहे. सरकारनं येथे खरोखर चांगली व्यवस्था केली आहे. पोलीस सर्वांना मदत करत आहेत. लोकांना उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल मी योगी सरकारचे मनापासून आभार मानते".
महाकुंभ दरम्यान कोणत्या दिवशी आहे शाही स्नान
- 13 जानेवारी 2025 - पौष पौर्णिमेला पहिले शाही स्नान झाले.
- 14 जानेवारी 2025 -मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर दुसरे शाही स्नान होईल.
- 29 जानेवारी 2025 - मौनी अमावस्येनिमित्त तिसरे शाही स्नान होणार आहे.
- 2 फेब्रुवारी 2025 - वसंत पंचमीच्या मुहूर्तावर चौथे शाही स्नान होणार आहे.
- 12 फेब्रुवारी 2025 - माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर पाचवे शाही स्नान होईल.
- 26 फेब्रुवारी 2025 - महाशिवरात्री निमित्त शेवटचे आणि सहावे शाही स्नान
महाकुंभादरम्यान कसे आहे नियोजन
- गर्दीच्या व्यवस्थापनासाठी प्रयागराजमध्ये 80 थांबण्याची ठिकाणे तयार करण्यात आली आहेत.
- संगमाजवळ 24 सॅटेलाइट पार्किंग लॉट बांधण्यात आली आहेत.
- अमृतस्नानासाठी 7 मार्गावरून करोडो भाविक महाकुंभ मेळाव्यात दाखल होणार आहेत.
- 102 पार्किंगच्या ठिकाणी 5 लाख वाहने पार्क करता येणार आहे.
- स्नान उत्सवासाठी स्वतंत्र वाहतूक व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
- महाकुंभामध्ये 10 हजार संस्थांचा सहभाग आहे.
- 1850 हेक्टरमध्ये पार्किंगची जागा तयार करण्यात आली.
- 67 हजार पथदिवे बसविण्यात आले आहेत.
- दीड लाख शौचालये बांधली आहेत.
- 1 लाख 60 हजार तंबू बांधण्यात आले आहेत.
- 25 हजार लोकांसाठी बेडची मोफत सुविधा आहे.
हेही वाचा-