ETV Bharat / technology

Poco X7 Pro 5G सेल थोड्याच वेळात होणार सुरू, सेलमध्ये मिळवा बंपर सूट - POCO X7 PRO 5G SALE STARTS TODAY

Poco X7 Pro 5G स्मार्टफोनचा सेल थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तुम्हाला या सेलमध्ये उत्तम ऑफर देखील मिळणार आहे. जाणून घेऊया सर्व माहिती...

Poco X7 Pro 5G
Poco X7 Pro 5G (Poco)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 14, 2025, 11:06 AM IST

हैदराबाद : काही दिवसांपूर्वीच भारतात Poco X7 Pro 5G लाँच करण्यात आला. हा फोन 90 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या मोठ्या बॅटरीसह लाँच करण्यात आला आहे. यात मीडियाटेक डायमेन्सिटी 8400 अल्ट्रा प्रोसेसर आहे. हा फोन दोन प्रकारांमध्ये आला आहे. या नवीनतम फोनची पहिली विक्री आज सुरू होत आहे. पहिल्या सेलमध्ये ग्राहकांना चांगली सूट दिली जाईल. ज्यामुळं फोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी होईल. त्याच्या ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती जाणून घेऊया...

सेलमध्ये तुम्हाला उत्तम ऑफर्स
Poco X7 Pro 5G स्मार्टफोनची विक्री आज दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाईव्ह होईल. तुम्ही हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून देखील खरेदी करू शकता. फोनच्या 8 जीबी + 256 जीबी कॉन्फिगरेशनची किंमत 26 हजार 999 रुपये आहे, तर त्याचा 12 जीबी + 256 जीबी व्हेरिएंट 28,999 रुपयांना येतो. पहिल्या सेलमधील ऑफर्सनंतर, दोन्ही फोनची किंमत 3000 रुपयांनी कमी होईल. यामध्ये 2000 रुपयांची बँक ऑफर आणि 1000 रुपयांची विशेष कूपन सवलत सामाविष्ट आहे. 12 महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील असेल. हा फोन नेब्युला ग्रीन, ब्लॅक आणि यलो रंगात उपलब्ध आहे.

पोको एक्स7 प्रो 5G स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : या फोनमध्ये 6.73 इंचाचा 1.5K AMOLED फ्लॅट डिस्प्ले आहे, जो 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्याची कमाल ब्राइटनेस 3200 निट्स आहे. त्याला गोरिल्ला ग्लास 7आयचं संरक्षण मिळालं आहे.
  • प्रोसेसर : कामगिरीसाठी यात मीडियाटेक डायमेन्सिटी 8400 अल्ट्रा प्रोसेसर आहे. जे LPDDR5X रॅम आणि UFS 4.0 स्टोरेजसह येत.
  • कॅमेरा : यात मागील पॅनलवर 50 मेगापिक्सेलचा सोनी LYT-600 प्रायमरी आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सेलचा सेन्सर उपलब्ध आहे.
  • बॅटरी आणि चार्जिंग : फोनमध्ये 6550 mAh बॅटरी आहे, जी 90W चार्जिंग सपोर्टसह येते. कंपनीनं दावा केला आहे, की ती फक्त 47 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज होऊ शकते.
  • ओएस : यात अँड्रॉइड 15 आधारित शाओमी हायपरओएस 2.0 ओएस आहे. यात तीन वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि चार वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतात.
  • एआय फीचर्स : पोको एक्स7 प्रो मध्ये एआय नोट्स, एआय रेकॉर्डर, एआय सबटायटल्स, एआय इरेज प्रो आणि एआय इंटरप्रिटर सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
  • इतर वैशिष्ट्ये : याला IP66/68/69 रेटिंग मिळालं आहे. फोनमध्ये वाय-फाय 6, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि डॉल्बी अ‍ॅटमॉससह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत.

हे वाचंलत का :

  1. सैनिक शाळांमध्ये प्रवेश घेण्याची शेवटी संधी, वेळ संपण्यापूर्वी 'असा' करा अर्ज
  2. सॅमसंग गॅलेक्सी Galaxy S25 सीरीजचे डिझाइन आणि स्पेसिफिकेशन लीक, जाणून घ्या Galaxy S25 मालिकेची अपेक्षित किंमत
  3. Whatsapp मध्ये गेमचेंजर फीचर; मेसेज शेड्यूल करण्यासाठी करा'या' फीचरचा वापर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.