मुंबई - Nupur Shikhare and Ira Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानसाठी आजचा दिवस मोठा आहे. आज 8 मे रोजी त्यांची लाडकी मुलगी आयरा खानचा वाढदिवस आहे. आज आयरा 27 वर्षांची झाली आहे. तिनं चालू वर्षी तिचा जिम ट्रेनर बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर राजस्थानमधील उदयपूरमध्ये लग्न केलं होतं. हा विवाह सोहळा खूप भव्य होता. या विवाहात अनेक स्टार्सनं हजेरी लावली होती. दरम्यान आयराच्या वाढदिवसानिमित्त तिला पती नुपूर शिखरेनं खास पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत. नुपूरनं सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याच्या लग्नाच्या उत्सवाची झलक दिसत आहे.
नुपूर शिखरेनं दिल्या आयरा खानला शुभेच्छा : या फोटोवर त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, "हॅपी बर्थडे माय लव्ह, आई लव यू सो मच " नुपूरनं शेअर केलेल्या फोटोमध्ये तो काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहे. यावर त्यानं आयरा खानचा लाल लग्नाचा स्कार्फ खांद्यावर घेतला आहे. दरम्यान आयराच्या हाताला मेहेंदी असून ती काळ्या पॅन्टसह लाल रंगाच्या लेहेंगा ब्लाउजमध्ये दिसत आहे. दोघेही फोटोसाठी पोज देताना दिसत आहेत. आयरा अनेकदा सोशल मीडियावर आपल्या पतीबरोबरचे फोटो शेअर करत असते. तिचे सोशल मीडियावर 6 लाख 55 हजार फॉलोअर्स आहेत. याशिवाय ती अनेकदा मानसिक आरोग्याबद्दल चाहत्याबरोबर बोलत असते.