मुंबई :अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं तिचे सासरे आणि अभिनेता अमिताभ बच्चनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन कुटुंबाबरोबर सुरू असलेल्या मतभेदांच्या अफवांना पुन्हा एकदा पूर्णविराम दिला आहे. बच्चन कुटुंबातील सुनेनं इंस्टाग्रामवर 'बिग बी'साठी वाढदिवसाची एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. यावर तिनं भावनिक नोटही जोडली आहे. या पोस्टमुळे बच्चन कुटुंबाबरोबर सुरू असलेल्या मतभेदाच्या चर्चा अफवा असल्याचं स्पष्ट होत आहे. 11 ऑक्टोबर रोजी ऐश्वर्या राय बच्चननं अमिताभ आणि तिची मुलगी आराध्याचा जुना फोटो पोस्ट केला होता. यामध्ये आराध्या आणि अमिताभ फोटोसाठी पोझ देताना दिले.
ऐश्वर्या राय दिल्या अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा : ऐश्वर्या रायनं शुभेच्छा दिलेल्या फोटोत आराध्याच्या हातात फुलं आहे. तिचे आजोबा अमिताभ बच्चननं आराध्याला लाडानं जवळ घेतल्याचे फोटोत दिसून येते. अमिताभ बच्चन आणि आराध्या हे ऑल व्हाईट लूकमध्ये दिसले. फ्लोरल ड्रेसमध्ये आराध्या खूपच आकर्षक दिसत आहे. या फोटोवर ऐश्वर्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हॅपी बर्थडे पा-आजोबा देव तुम्हाला सदैव आनंदी ठेवो.' या पोस्टवर ऐश्वर्यानं काही सुंदर इमोजी जोडले आहेत. यापूर्वी ऐश्वर्या रायनं घटस्फोटाच्या अफवांना ब्रेक लावला होता. नुकतीच ती मुलगी आराध्याबरोबर पॅरिस फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. ती अनेक ठिकाणी अभिषेकबद्दलच्या भावना व्यक्त करताना दिसते.