मुंबई - Genelia Deshmukh Birthday:अभिनेत्री जेनेलियाला डिसूजा-देशमुख आज 5 ऑगस्ट रोजी 37 वर्षांची झाली आहे. या विशेष प्रसंगी तिचे चाहते आणि सेलिब्रिटी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या दिवशी, तिचा पती रितेश देशमुखनं आपल्या अनोख्या अंदाजात आपल्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. या व्हिडिओत तो जेनेलियाबरोबर दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना रितेशनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "हॅपी बर्थडे बायको. तू खरोखरच माझे आयुष्य बदलले आहेस. या पोस्टवर रितेशची क्यूट पत्नी जेनेलियानं देखील कमेंट केली आहे. तिनं कमेंट सेक्शनमध्ये ग्रीन हार्ट इमोजीसह लिहिलं, "मला तुमचे जीवन बदलत राहायचे आहे."
रितेश देशमुख आणि जेनेलियाचा व्हिडिओ व्हायरल : रितेश आणि जेनेलियाच्या व्हिडिओमध्ये पतीचे लग्नापूर्वी आणि नंतरचे प्रेम कसे असते याची झलक दाखवण्यात आली. सुरुवातीला, हे जोडपं 90 च्या दशकातील रोमँटिक गाणं 'तुमसा कोई प्यारा'वर परफॉर्म करताना दिसतं. तर दुसऱ्या हाफमध्ये रितेश मजेदार पद्धतीनं जेनेलियाचे पाय दाबताना दिसतो. नेहमीप्रमाणे या जोडप्याच्या व्हिडिओला त्यांच्या चाहत्यांनी खूप पसंत केलं आहे. तसंच, या जोडप्याचं अनेकांनी कौतुक केलं आहेत. या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, "अशी जर पत्नी मिळाली, तर कोणी पण गुलामी करेल" दुसऱ्या एकानं लिहिलं, "बॉलिवूडमधील एक नंबरची जोडी आहे." आणखी एकानं लिहिलं, "वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनीसाहेब." याशिवाय काहीजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.