मुंबई - Happy Birthday Aamir khan : अभिनेता आमिर खान हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. आमिर खान 35 वर्षांहून अधिक काळापासून हिंदी चित्रपटसृष्टीत आहे. आमिर खानच्या करिअरमधील सर्वात कमाई करणारा चित्रपट म्हणजे 'दंगल' आहे. आता आमिरच्या वाढदिवशी, आम्ही त्याच्या एकूण संपत्ती आणि चित्रपटासाठी फीबद्दल सांगणार आहोत. याशिवाय तो शाहरुख खान आणि सलमान खानपेक्षा कमाईमध्ये किती पुढे आणि किती मागे आहे या लेखाद्वारे तुम्हाला कळेल.
आमिर खान : आज 14 मार्च रोजी आमिर खान 59 वर्षांचा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आमिर खान एका चित्रपटासाठी 100 ते 175 कोटी रुपये घेतो. त्याची सध्याची संपत्ती 1,862 कोटी रुपये आहे. चित्रपट हिट झाल्यानंतर आमिर 70 टक्के नफाही घेतो, असं देखील म्हटले जाते.
सलमान खान : हिंदी चित्रपटसृष्टीतील तीन खानांपैकी एक सलमान खान हा सर्वात जास्त चित्रपट करणारा आहे. सलमान खान आणि आमिर खान यांच्या करिअरची सुरुवात जवळपास एकाच वेळी झाली. मीडिया रिपोर्टनुसार 'भाईजान'ची एकूण संपत्ती 2,900 कोटी रुपये आहे. सलमान खान मासिक 16 कोटी रुपये आणि वार्षिक 220 कोटी रुपये कमावतो. सलमान एका चित्रपटासाठी 100 ते 150 कोटी रुपये घेत असतो.
शाहरुख खान :हिंदी चित्रपटसृष्टीतील 'बादशाह' शाहरुख खान जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. शाहरुख एका चित्रपटासाठी 150 ते 250 कोटी रुपये फी घेतो. अलीकडील अहवालानुसार, शाहरुख खानची एकूण संपत्ती 6,200 कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला होता.
सर्वाधिक मानधन घेणारे भारतीय स्टार्स आणि त्यांची संपत्ती
रजनीकांत - 150 ते 210 कोटी (नेट वर्थ - 430 कोटी)