ETV Bharat / politics

"मुख्यमंत्री भाजपाचाच तर उपमुख्यमंत्री..."; अजित पवारांचं मोठं विधान, स्वप्न पाहणारे क्लिन बोल्ड? - AJIT PAWAR ON CM POST

अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केलं. तसंच यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांनाही टोला लगावला.

AJIT PAWAR ON CM POST
अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2024, 9:44 PM IST

Updated : Nov 30, 2024, 10:57 PM IST

पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यामुळं राज्यातील विरोधक आक्रमक झाले आहेत. पुण्यात ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांनी ईव्हीएम घोटाळ्यावरून आत्मक्लेष आंदोलन पुकारलं होतं. बाबा आढाव यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार पुण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

पराभवाचं खापर ईव्हीएमवर : यावेळी अजित पवार म्हणाले, "विधानसभा निवडणुकीचा निकाल हा विरोधकांच्या एवढ्या जिव्हारी लागला आहे की, ते तो निकाल सहन करू शकत नाहीत. त्यामुळं आता ते ईव्हीएममध्ये दोष काढत आहेत. जर वेगळा निकाल लागला असता, तर यावर कोणीही काहीही बोललं नसतं. तसंच सुप्रीम कोर्टानं देखील ईव्हीएमबाबत सांगितलं आहे की, अशा पद्धतीनं तक्रार करता येत नाही. विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. स्वतःच्या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडत आहेत."

माध्यमांशी बोलताना अजित पवार (Source - ETV Bharat Reporter)

मुख्यमंत्री त्यांचाच होणार : मुख्यमंत्रिपदाबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "अंदाजे पाच तारखेला मुख्यमंत्र्यांची शपथ होणार आहे. त्यानंतर आम्ही एकत्र बसून खाते वाटप करणार. तसंच आमच्यात कुठंही रस्सीखेच नसून जो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह घेतील तो मान्य असणार. भाजपाच्या 132 जागा निवडून आल्यानं मुख्यमंत्री त्यांचाच होणार." अजित पवार यांच्या या विधानानं शिवसेनेत खळबळ उडण्याची शक्यता आहे.

दोन उपमुख्यमंत्री होतील : दिल्लीत झालेल्या बैठकीबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे, यावर बैठकीत चर्चा झाली. तसंच भाजपाचा मुख्यमंत्री होईल आणि राहिलेल्या दोन पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री होतील, असं बैठकीत ठरलं आहे."

बहिणींनी आम्हाला सत्तेवर बसवलं : अजित पवार यांना यावेळी एका महिलेनं 'लाडकी बहीण योजने'बाबत विचारलं असता ते म्हणाले, "लोकसभेत आमचा पराभव झाल्यावर विधानसभेत आम्हाला सत्तेत यायचं होतं, त्यामुळं आम्ही 'लाडकी बहीण योजना' आणली. विरोधात बसून प्रश्न सुटत नाहीत. जनतेचा आमच्यावर विश्वास होता, म्हणून लाडक्या बहिणींनी आम्हाला सत्तेवर बसवलं."

हेही वाचा

  1. मुख्यमंत्रिपदी कोण? अजूनही गुलदस्त्यात, मात्र शपथविधीची तारीख ठरली, मोदी येणार कार्यक्रमाला
  2. किती लाडक्या बहिणींना मंत्रिमंडळात स्थान मिळणार? 'या' नावांची होतेय चर्चा
  3. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत हे सर्वसामान्य जनतेला वाटणं स्वाभाविक - गुलाबराव पाटील

Last Updated : Nov 30, 2024, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.