ETV Bharat / state

रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं राज ठाकरेंच्या हस्ते होणार लोकार्पण, स्मारकात काय असणार?

सचिन तेंडुलकरचे गुरू रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं 3 डिसेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. या लोकार्पणाला त्यांचे शिष्य आणि महत्त्वाचे राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.

RAMAKANT ACHAREKAR MEMORIAL
रमाकांत आचरेकर (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2024, 10:34 PM IST

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ जगातील सर्वात यशस्वी क्रिकेट संघांपैकी एक आहे. यावर्षी भारतीय क्रिकेट संघानं टी-20 विश्वचषकही जिंकला. क्रिकेटविश्वात आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक क्रिकेटपटू चांगली कामगिरी करत आहेत. पण या यशस्वी क्रिकेटपटूंना घडवण्यात प्रशिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. दरम्यान, महान प्रशिक्षक आणि मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू तथा भारतरत्न सचिन तेंडुलकरचे गुरू रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं शिवाजी पार्क येथे 3 डिसेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. या लोकार्पणाला त्यांचे शिष्य आणि महत्त्वाचे राजकीय नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी दिली. आज त्यांनी मुंबईतील पार्क क्लब येथे पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

शिवाजी पार्क सरांची कर्मभूमी : प्रवीण आमरे म्हणाले की, "रमाकांत आचरेकर यांनी आमच्यासारख्या अनेक क्रिकेटपटूंना घडवलं. शिवाजी पार्क ही त्यांची कर्मभूमी आहे, त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक उभारले जात आहे, याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. या स्मारकात त्यांच्या अनेक आठवणी असणार आहेत. यासह क्रिकेट साहित्य असणार म्हणजे बॉल, बॅट, पॅड, स्टंप तसंच आचरेकर सर यांच्या अनेक आठवणी असणार आहेत. विशेष म्हणजे आचरेकर सरांची आवडती टोपी ही सुद्धा या स्मारकात पाहायला मिळणार. त्यांनी आम्हाला केवळ एक क्रिकेटपटू म्हणून नाही तर, प्रशिक्षक म्हणूनही आम्हाला घडवलं आणि तीच शिकवण आम्ही पुढे नेत आहोत. सर्वांच्या सहकार्यानं आणि पाठिंबानं हे स्मारक होत आहे. महाराष्ट्र सरकार आणि ज्यांनी पाठिंबा दिला, त्या सर्वांना धन्यवाद देतो. 3 डिसेंबर रोजी या स्मारकाचं उद्घाटन होणार आहे. त्यावेळी अनेक महत्त्वाचे नेते आणि सर्व त्यांचे शिष्य उपस्थित राहणार आहेत."

राज ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण : या स्मारकासाठी शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र शासनानं जागा दिली आहे. त्यामुळं त्यांचेही आभार मानावे तेवढे कमीच, तसंच राज ठाकरे यांनीही सहकार्य केलं. 3 डिसेंबर रोजी आचरेकर सरांचे शिष्य, मी स्वतः तसंच सचिन तेंडुलकर आणि अनेक महत्वाचे लोकं उपस्थित राहणार आहेत. रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार," असं प्रवीण आमरे यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. दक्षिण आफ्रिकेकडून 'लंकादहन'... पहिल्याच कसोटीत श्रीलंकेचा दारुण पराभव
  2. न भूतो न भविष्यति... 13 वर्षीय वैभवनं दुबईत मैदानात पाऊल ठेवताच रचला इतिहास; आतापर्यंत कोणालाच जमलं नाही
  3. श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामना सुरु असताना दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना अटक, क्रिकेट विश्वात खळबळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.