ETV Bharat / state

महायुतीमधील दोन पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष; परस्पर विरोधी गुन्हा दाखल - MAHAYUTI TWO PARTIES CLASHES

अक्कलकुवा येथे महायुतीमधील दोन पक्षात वाद झाला. यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

MAHAYUTI TWO PARTIES CLASHES
महायुतीमधील दोन पक्षात वाद (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2024, 10:56 PM IST

नंदुरबार : अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार आमश्या पाडवी यांच्याविरुद्ध महिलेने विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल केला. महिलेने केलेल्या आरोपानुसार, आमदार आमश्या पाडवी, मुलगा शंकर पाडवी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केली. याबाबत पीडित महिलेनं अक्कलकुवा पोलीस ठाण्यात सुमारे 9 ते 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर आमदार पाडवी यांची मुलगी अंजू आमश्या पाडवी यांनी देखील शिवसेना व भाजपातील काही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिली.

राजकीय वाद पेटला : अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे दोन गटात राजकीय वाद पेटला आहे. शिवसेनेचे नवनियुक्त आमदार आमश्या पाडवी यांच्यावर महिलेने विनयभंग आणि मारहाण केल्याचा आरोप करत ती थेट अक्कलकुवा पोलीस ठाण्यात पोहचली. सदर पीडित महिला आणि तिचा भाऊ भाजपाचे कार्यकर्ते आहेत. पीडित महिलेचा भाऊ भाजपा पंचायत समिती सदस्य आहे. पीडित महिलेनं केलेल्या आरोपावरून ग्रामपंचायत निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत आमश्या पाडवी यांच्या विरोधात काम केल्याच्या रागातून कुटुंबातील सदस्य आणि महिलेला मारहाण केल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार आमश्या पाडवी, मुलगा जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी, सोरापाडा सरपंच आ. आमश्या पाडवी यांची मुलगी अंजु आमश्या पाडवी यांच्यासह कार्यकर्ते यांच्यावर अक्कलकुवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी दिला माहिती (Source - ETV Bharat Reporter)

आमदार आमश्या पाडवी यांच्या मुलीनेही भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा केला दाखल : आमदार आमश्या पाडवी यांची मुलगी अंजू पाडवी यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात शिसेनेचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, भाजपा नेते नागेश पाडवी, भाजपा तालुका अध्यक्ष नितेश वळवी यासह पीडित महिला आणि तिच्या भावाच्या विरोधात अक्कलकुवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

  1. तब्येत बिघडल्यानं एकनाथ शिंदे 'सलाईन'वर; न भेटताच दीपक केसरकर महाबळेश्वरमधून माघारी परतले
  2. "मुख्यमंत्री भाजपाचाच तर उपमुख्यमंत्री..."; अजित पवारांचं मोठं विधान, स्वप्न पाहणारे क्लिन बोल्ड?
  3. मुख्यमंत्रिपदी कोण? अजूनही गुलदस्त्यात, मात्र शपथविधीची तारीख ठरली, मोदी येणार कार्यक्रमाला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.