ETV Bharat / entertainment

'भीमराया तुझ्यामुळे' या गाण्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी श्रद्धांजली!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यातिथीनिमत्तानं 'भीमराया तुझ्यामुळे' हे गाणं लॉन्च करण्यात आलं असून मनीष राजगिरेच्या स्वरांत भावस्पर्शी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

Bhimaraya Tujhamule song
भीमगीत 'भीमराया तुझ्यामुळे' (BHIMGEET BHIMARAYA TUJHAMULE)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 30, 2024, 5:58 PM IST

मुंबई - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची ६ डिसेंबर रोजी पुण्यतिथी आहे. ६ डिसेंबर १९५६ रोजी आंबेडकरांचे दिल्लीत निधन झालं. ते भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री होते आणि १९९० मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला. ६ डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जातो. त्या दिवशी मुंबईतील त्यांच्या स्मृतिस्थळाला देशभरातील त्यांचे अनुयायी भेट देतात. महानायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'भीमराया तुझ्यामुळे' या गाण्यातून मनीष राजगिरेच्या स्वरांत भावस्पर्शी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने बदललेल्या जीवनकथेचा अनोखा प्रवास या गाण्यातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि सर्वसामान्यांच्या अधिकारांचे अधिष्ठान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सन्मानपूर्वक श्रद्धांजली वाहणाऱ्या 'भीमराया तुझ्यामुळे' या म्युझिक व्हिडिओनं अनेकांची मनं जिंकली आहेत. डॉ. आंबेडकरांच्या संघर्षामुळे समाजातील अनेकांच्या आयुष्याला दिशा मिळाली, हीच प्रेरणादायी गोष्ट या व्हिडिओतून चित्रित करण्यात आली आहे. गावातील एका तरुणाची संघर्षमय कथा या व्हिडिओत मांडण्यात आली आहे. उच्च-नीचतेच्या जुन्या प्रथांनी पछाडलेल्या समाजात वाढलेल्या या तरुणाला आईच्या कष्टांनी शिक्षण घेता आलं. गावात सहन केलेला भेदभाव त्याच्या मनात अजूनही जिवंत आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या हक्कांमुळे आणि संविधानाच्या आधारानं तो शिक्षण घेऊन मोठ्या हुद्द्याला पोहोचतो. त्याच्या प्रवासाची ही कहाणी प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारी आहे.

या म्युझिक व्हिडिओच्या निर्मितीमागे अमित बाईंग, सचिन जाधव आणि प्रदीप जाधव यांची मेहनत आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी अमित बाईंग यांनी समर्थपणे पार पाडली आहे. श्रेयश राज अंगाणे यांनी संगीत दिग्दर्शन, गीतलेखन, पटकथा आणि संवाद लेखन केलं आहे. निखिल चंद्रकांत पाटील यांनी कथा लिहिली असून छायांकन हरेश सावंत यांनी केलं आहे. गायक मनीष राजगिरे यांच्या सुमधुर आवाजानं या गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेलं आहे. या व्हिडिओत मेघा घाडगे, नितेश कांबळे, मानस तोंडवळकर, आणि नरेंद्र केरेकर यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत.

'भीमराया तुझ्यामुळे' हा म्युझिक व्हिडिओ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आणि विचार यांना उजाळा देत प्रेक्षकांना एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जातो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.