महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

गुढीपाडवाच्या विशेष प्रसंगी 'या' मराठी कलाकारांनी दिल्या चाहत्यांना शुभेच्छा - marathi celebs and Gudi padwa - MARATHI CELEBS AND GUDI PADWA

Gudi padwa : गुढीपाडवा हा दिवस खूप विशेष आहे. या दिवशी अनेक सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यामातून शुभेच्छा दिल्या आहेत.

Gudi padwa
गुढीपाडवा

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 9, 2024, 1:15 PM IST

मुंबई - Gudi padwa :महाराष्ट्रीयन नववर्ष म्हणूनही ओळखला जाणारा गुढीपाडवा , हा दिवस अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडवा हा वर्षातील एक विशेष आणि शुभ दिवस आहे. प्रेम आणि समृद्धीचा उत्सव असलेल्या या दिवशी अनेकजण पोस्ट शेअर करून आनंद लुटताना दिसत आहेत. हिंदू नववर्षाच्या विशेष प्रसंगी, अनेक मराठी सेलिब्रिटींनी त्यांचे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि त्यांच्या चाहत्यांना निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय या पोस्टवर अनेक चाहते कमेंट्स करून या सेलिब्रिटींवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

  • स्वप्निल जोशी : अभिनेता स्वप्निल जोशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.
गुढीपाडवा
  • अमृता खानविलकर : अभिनेत्री अमृता खानविलकरनं मराठमोळ्या पारंपरिक अंदाजात गुढीपाडवा साजरा केला आहे. तिनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
गुढीपाडवा
  • प्रार्थना बेहेरे :अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनं एक सुंदर व्हिडिओ शेअर करून तिच्या चाहत्यांना खास अंदाजात पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा हा व्हिडिओ खूप आकर्षक आहे.
गुढीपाडवा
  • प्रथमेश परब :अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांनी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा खास पद्धतीने साजरा केला. त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडवा
  • सुयश टिळक : अभिनेता सुयश टिळकनं गुढीचा फोटो शेअर करून, चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय त्यानं एक व्हिडिओ देखील शेअर केला, ज्यात गुढीची पूजा होताना दिसत आहे.
  • आकाश नलावडे : 'सहकुटुंब सहपरिवार' फेम आकाश नलावडे गुढीपाडवा सण साजरा करत आहे. या खास दिवशी त्यानं आपल्या पत्नीबरोबर फोटो शेअर करून चाहत्यांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडवा
  • महाराष्ट्रीयन नववर्ष : आजपासून म्हणजेच 9 एप्रिलपासून हिंदू नववर्ष सुरू झाले आहे. धार्मिक मान्यतांच्या आधारे असं म्हटलं जातं की, या दिवशी ब्रह्मदेवानं आपल्या विश्वाची निर्मिती केली होती. गुढी ही ब्रह्मदेवाच्या ध्वजाशी संबंधित आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details