मुंबई - Shah rukh khan : शाहरुख खान भारता इतकाच देशाबाहेरची अफाट लोकप्रिय आहे. जगभर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याची सिग्नेचर पोज आणि त्याचे डायलॉग सामान्य लोकांच्या जिभेवर आहेत.शाहरुख खाननं इथपर्यंत पोहचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. प्रसिद्धी, स्टारडम आणि पैसा या सर्व गोष्टी 'किंग खान'नं सर्व काही खूप कमी वयात कमावले आहे. त्याचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. शाहरुखचे चाहते जगभरात आहे. एवढं नाव कुठल्याही बॉलिवूड स्टारनं कमावलं नाही. फ्रान्समध्ये त्याला मिळालेल्या सन्मानाची जुनी पोस्ट पुन्हा समोर आली आहे.
फ्रान्समध्ये झाला होता शाहरुख खानचा सन्मान:शाहरुखनं आपल्या 30 वर्षांच्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीत, अतुलनीय चित्रपट दिले आणि त्यांचं योगदान कौतुकास्पद आहे. त्यामुळेच अनेक परदेशी देशांनीही त्यांना विशेष सन्मान आणि पुरस्कार देत असतात. फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या ग्रेविन ग्लासनं 'किंग खान'च्या सन्मानार्थ खास सोन्याचं नाणं काही वर्षापूर्वी जारी केलं होतं. हा पुरस्कार मिळवणारा तो एकमेव बॉलिवूड अभिनेता बनला होता. 2018 मध्ये, शाहरुख खानच्या सन्मानार्थ, पॅरिसच्या प्रसिद्ध ग्रेविन संग्रहालयानं सोन्याचे नाणं जारी केल्यानंतर त्याचे चाहते आता खूश आहेत. शाहरुखच्या एका फॅन पेजनं या नाण्याची झलक दाखवत या विशेष सन्मानबद्दल माहिती दिली आहे.