मुंबई- आज 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन डेच्या सप्ताहाला सुरू झाली. आज रोझ डे साजरा होत आहे. प्रेमाच्या आठवड्यातील हे 8 दिवस खूप खास मजले जातात. हा खास सोहळा आणखी स्पेशल बनवण्यासाठी बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची ग्लॅमरस पत्नी गौरी खानने एक नवी सुरुवात केली आहे. व्यवसायाने इंटेरिअर डिझायनर असलेल्या गौरी खाननं मुंबईत तिचं नवीन रेस्टॉरंट उघडलंय. विशेष म्हणजे व्हॅलेंटाइन सप्ताह सुरू होण्याच्या एक दिवस आधी ६ फेब्रुवारीच्या रात्री या रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात आलं.
विशेष दिवशी नव्या जोडप्यांसाठी नवीन रेस्टॉरंट - 'टोरी' असे गौरी खानच्या या रेस्टॉरंटचे नाव आहे. खाकी रंगाच्या पँट सूटमध्ये गौरी खान रेस्टॉरंटचे दार ग्राहकांसाठी उघडताना दिसली. शाहरुख खान आणि गौरी खान यांची प्रेमकहाणी संपूर्ण जगाला माहीत आहे. नव्या जोडप्यांनी आपली लव्ह स्टोरी सुरू करावी यासाठीच गौरीनं हे नवीन रेस्टॉरंट सुरू केलंय
बिझनेसवुमन गौरी खान - गौरी खान एक उत्कृष्ट इंटिरियर डिझायनर आहे. तिनं चित्रपट निर्माता करण जोहर, अनन्या पांडे आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्सच्या घरांचे इंटीरियर डिझाइन केलंय. गौरी खानही अनेकदा बॉलिवूड पार्ट्यांमध्ये स्पॉट होताना दिसते. गौरी खान बिझनेसवुमन असण्यासोबतच एक चांगली पत्नी आणि आई देखील आहे. इतकंच नाही तर गौरी तिचा धाकटा मुलगा अबराम खानच्या शाळेतील फंक्शन्सलाही हजेरी लावायला विसरत नाही.
शाहरुख खान-गौरी खान जोडपे- बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने गौरी खान हिच्याशी 25 ऑक्टोबर 1991 रोजी लग्न केलं होतं. गेल्या 23 वर्षाच्या त्यांच्या सुखी संसारात अनेक चढ उतार आले मात्र त्यांच्यातील प्रेम कमी झालेलं नाही. शाहरुखच्या पडत्या काळात तिने भक्कम आधार देऊन आपला संसार सावरला आणि तीन मुलांचं उत्तम संगोपन ती करत आहे. तिची मुलेही आईवर खूप प्रेम करतात आणि तिच्यासोबतचे फोटो पोस्ट करुन व्यक्तही होत असतात. यंदाच्या व्हॅलेंटाईन निमित्ताने आपल्या प्रेमाचा आदर्श इतर जोडप्यांसोबत ठेवत तिने नव्या रेस्टॉरंटची सुरुवात केली आहे.
हेही वाचा -
- जॉन अब्राहम स्टारर 'वेदा' चित्रपटाचं पोस्टर रिलीज
- प्रियांका चोप्रानं दाखवली कुशीतील मालतीबरोबरची सुंदर झलक
- ईशा देओल आणि भरत तख्तानी लग्नाच्या १२ वर्षांनंतर झाले वेगळे