महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'राम चरण' स्टारर अ‍ॅक्शन ड्रामा 'गेम चेंजर' 100 कोटी क्लबच्या जवळ, जाणून घ्या किती केली कमाई... - GAME CHANGER COLLECTION DAY 4

'गेम चेंजर' 100 कोटी क्लबच्या जवळ आहे. या चित्रपटानं 4 दिवसामध्ये किती कमाई केली, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

game changer
गेम चेंजर ('गेम चेंजर' (पोस्टर))

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 14, 2025, 11:30 AM IST

मुंबई :ग्लोबल स्टार राम चरणचा नवीन चित्रपट 'गेम चेंजर' शुक्रवार, 10 जानेवारी रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. थिएटरमध्ये रिलीजपूर्वी या चित्रपटाबद्दल खूप चर्चा झाली होती. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन 4 दिवस झाले आहेत. राम चरण आणि कियारा अडवाणी स्टारर हा चित्रपट 4 दिवसांत 100 कोटींचा टप्पा गाठणार आहे. आज सुट्टीचा फायदा या चित्रपटाला नक्कीच होईल असं सध्या दिसत आहे.

'गेम चेंजर'चं एकूण कलेक्शन : 'गेम चेंजर' 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या मार्गावर असून या चित्रपटानं आतापर्यत बॉक्स ऑफिसवर 97 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं चौथ्या दिवशी 8.50 कोटी रुपये कमावले आहे. एस शंकर दिग्दर्शित 'गेम चेंजर'नं पहिल्या दिवशी 51 कोटी रुपये कमावले. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी घट झाली. पहिल्या शनिवारी या चित्रपटानं 21.6 कोटींची कमाई केली. 'तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 15.9 कोटी, चौथ्या दिवशी 8.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आता चित्रपटाच्या कलेक्शन ग्राफमध्ये पुन्हा एकदा घसरण झाली आहे. 4 दिवसांत 'गेम चेंजर' 100 कोटीचा आकडा पार करण्यात अपयशस्वी ठरला आहे.

डे इंडिया नेट कलेक्शन :

'गेम चेंजर'नं पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 51 कोटींचा गल्ला जमवला.

'गेम चेंजर'नं दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 21.6 कोटींचा गल्ला जमवला.

'गेम चेंजर'नं तिसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 15.9 कोटी रुपयांची कमाई केली.

'गेम चेंजर'नं चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 8.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

या चित्रपटाचं एकूण 97 कोटी रुपये कलेक्शन झालं.

'गेम चेंजर' किती भाषांमध्ये झाला प्रदर्शित :'गेम चेंजर' हा एक राजकीय अ‍ॅक्शन ड्रामा आहे, जो राम नंदन (राम चरण) नावाच्या आयएएस अधिकाऱ्याच्या कहाणी भोवती फिरतो. या चित्रपटात कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्री आहे. 'गेम चेंजर' हा चित्रपट तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा :

  1. राम चरण स्टारर 'गेमचेंजर'च्या कमाईत दुसऱ्या दिवशी झाली घट, जाणून घ्या किती केलं कलेक्शन
  2. 'गेम चेंजर'नं १८६ कोटीच्या ओपनिंगसह बॉक्स ऑफिसवर राज्य केले, मात्र 'पुष्पा २' आणि 'देवरा'चं रेकॉर्ड अबाधित
  3. 'गेम चेंजर' पहिल्या दिवशी किती कमाई करेल, जाणून घ्या...

ABOUT THE AUTHOR

...view details