महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

यूके ते हैदराबादपर्यंत 'कल्की 2898 एडी' रिलीजसह प्रभासचा ज्वर वाढला - Kalki 2898 AD Release

बहुप्रतिक्षित 'कल्की 2898 एडी' चित्रपट आज २७ जून रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज झाला आहे. भव्य पोस्टर्स आणि उत्कंठा वाढवणाऱ्या चित्रपटाचे कटआऊट्स यामुळे चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. या चित्रपटाला यकेपासून हैदराबादपर्यंत चाहत्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.

Kalki 2898 AD
कल्की 2898 एडी (Kalki 2898 AD poster)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 3:04 PM IST

हैदराबाद- 'कल्की 2898 एडी' चित्रपट प्रदर्शित झाल्यानं प्रभासच्या चाहत्यांना आशेनं वेड लावलं आहे. नाग अश्विन दिग्दर्शित या भव्य साय-फाय चित्रपटाबाबतचा उत्साह, प्रभासच्या चाहत्यांनी पहिल्या दिवसाच्या पहिल्या शोसाठी सिनेरसिकांची गर्दी केल्यानं प्रभास फिव्हर वाढला आहे.

तेलुगू भाषिक राज्यांपासून ते भारताच्या कानाकोपऱ्यात आणि त्यापलीकडेही उत्साही चाहते 'कल्की 2898 एडी'वर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चाहत्यांच्या पोस्ट्स आणि फोटोंनी भरुन गेला आहे. आज 27 जून रोजी चित्रपटाच्या भव्य प्रदर्शनाचे हजारो लोक साक्षीदार बनले आहेत.

यूकेमध्ये, थिएटरमधून बाहेर पडलेल्या प्रभासच्या चाहत्यांचे व्हिज्युअल मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन प्रसारित होत आहेत. दरम्यान, हैदराबादच्या संध्या थिएटर्समध्ये चित्रपटाच्या प्रीमियरपूर्वीच उत्सवाचं वातावरण पसरले होतं. प्रभासचे लार्जर-दॅन-लाइफ पोस्टर्स आणि 'कल्की 2898 एडी' च्या रिलीजचे कटआऊट्स शहराच्या विविध ठिकाणी दिसले. अभिनेता प्रभास ज्याला प्रेमानं 'डार्लिंग्स' म्हणतात त्याचे चाहते 'कल्की 2898 एडी'साठी वेडे झाल्याचं चित्र हैदराबादमध्ये पाहायला मिळालं.

हा महत्त्वाकांक्षी चित्रपट पौराणिक कथा आणि विज्ञान कल्पित घटकांचे मिश्रण यांच्या जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव देणारा आहे. अमिताभ बच्चन सारख्या दिग्गज अभिनेत्यानं यामध्ये अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट काशीच्या भविष्यकालीन क्षेत्रात उलगडत जातो. या चित्रपटात विष्णूच्या 10 व्या अवतारानं प्रेरित असलेल्या कल्कीच्या उदयास कारणीभूत असलेल्या कथेचा शोध यामध्ये घेण्यात आला आहे.

अंदाजे 600 कोटी रुपयांचे अंदाजे बजेट आणि 181 मिनिटांच्या रनटाइमसह, 'कल्की 2898 एडी' तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड यासह अनेक भाषांमध्ये रिलीज झाला. आरआरआर सारख्या अलीकडील ब्लॉकबस्टरच्या तुलनेत प्रचार कमी असूनही टीझर, ट्रेलर आणि पडद्यामागील झलक सिने रसिकांमध्ये कुतूहल जागृत करण्यात यशस्वी झाल्याचं दिसत आहे.

जसजसे चाहते 'कल्की 2898 एडी' च्या नाट्यमय चित्रपटाचा आनंद घेत आहेत, तसतसे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड पुन्हा लिहिण्याच्या शक्यतेच्या अपेक्षा वाढत आहेत.

हेही वाचा -

  1. 'जगात भारी पंढरीची वारी', विठू-रखुमाईच्या भक्तांना संदीप पाठक देतोय वारीची अनुभूती - Jagat Bhari Pandharichi Wari
  2. खासदार कंगना रनौत आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचं संसदेत 'पुनर्मिलन' !! - Kangana Ranaut and Chirag Paswan
  3. 'चंदू चॅम्पियन'साठी अंगात ताप असताना सलग 9 तास पोहत होता कार्तिक आर्यन, केला व्हिडिओ शेअर - KARTIK AARYAN

ABOUT THE AUTHOR

...view details