महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Karan and Farah : फराह खाननं करण जोहरच्या आलिशान बेडरूम आणि वॉर्डरोब कलेक्शनचा व्हिडिओ केला शेअर - Karan johar and Farah khan

Karan and Farah : फराह खाननं करण जोहरच्या आलिशान बेडरूम आणि वॉर्डरोब कलेक्शनचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही धमाल करताना दिसत आहेत.

Karan and Farah
करण आणि फराह

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 10:16 AM IST

मुंबई - Karan and Farah : निर्माता करण जोहर आणि कोरियोग्राफर फराह खान यांच्यातील मैत्री सर्वांनाच माहिती आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. एकत्र असताना फराह आणि करण खूप धमाल करतात. फराह खाननं करण जोहरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्याच्या आलिशान बेडरूम आणि वॉर्डरोबची झलक दिसत आहे. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकजण आता कमेंट्स करत आहेत.

करण जोहरची आलिशान बेडरूम : करण जोहरच्या आलिशान बेडरूमच्या वॉर्डरोबमध्ये डिझायनर कपडे दिसत असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय बनला आहे. फराह खाननं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेकजण सोशल मीडियावर करणच्या घराच्या इंटेरिअरचे कौतुक करत आहेत. करण हा मुंबईतील डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये त्याची आई आणि दोन मुलांबरोबर राहतो. करणच्या घरातील प्रत्येक वस्तू ही योग्य ठिकाणी दिसत आहे. त्याचे घरही एखाद्या चित्रपटातील घरासारखे अतिशय सुंदर आहे. व्हिडिओमध्ये करणनं त्याचे खास चमकदार जॅकेट आणि शर्ट देखील फराहला दाखवले आहे.

फराह खाननं शेअर केला व्हिडिओ : व्हिडिओमध्ये फराह असे म्हणताना दिसते की, ''हे सर्व पाहिल्यानंतर मला खूप गरीब वाटत आहे.'' याशिवाय व्हिडिओत फराह पुढे म्हणते, ''आम्ही करण जोहरच्या नवीन रूममध्ये जात आहोत''. यानंतर करण त्यांना त्याच्या घरी फेरफटका मारतो. दुसरीकडे दोघेही एका मोठ्या खोलीत प्रवेश करतात. करण सांगतो, ''सर्वप्रथम माझ्या बेडरूमकडे बघ आणि इथे माझ्या कपड्यांचे कलेक्शन आहे.'' यानंतर दोघेही बोलताना व्हिडिओत दिसत आहेत. दरम्यान, करण जोहर नेहमी त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणानं बोलतो. करण जोहर शेवटी सर्वात लोकप्रिय शो 'कॉफी विथ करण 8' होस्ट करताना दिसला होता. अनेकदा तो चित्रपटसृष्टीतील पार्ट्यांमध्ये जाताना दिसतो. आता नुकताच तो मिस वर्ल्ड स्पर्धेची 71वी आवृत्तीमध्ये होस्ट करताना दिसला होता.

हेही वाचा :

  1. नव्या नवेली नंदानं आई श्वेता बच्चनच्या वाढदिवसानिमित्त शेअर केले खास फोटो
  2. Nick Jonas : देसी गर्लचा लूक पाहून पती निक जोनासनं केलं कौतुक
  3. Ed Sheeran : ग्लोबल सिंगर एड शिरीन कॉन्सर्टनंतर मुंबई विमानतळावर झाला स्पॉट ; व्हिडिओ व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details