मुंबई - Don 3 : अभिनेता इमरान हाश्मीनं रणवीर सिंग आणि कियारा अडवाणीच्या 'डॉन 3'मध्ये खलनायकच्या भूमिकेत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यानं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. इमरान 'डॉन 3'मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे त्याचे चाहते आता नाराज झाले आहेत. त्याच्या पोस्टवर कमेंट्स करून त्याला खलनायकच्या भूमिकेत पाहण्याची अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. स्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना इमराननं लिहिलं, ''मी 'डॉन 3'चा भागाचा होणार नाही. '' याशिवाय त्यानं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो ग्रे टी-शर्ट आणि ब्लूमध्ये जीन्समध्ये दिसत आहे.
इमरान हाश्मीनं पोस्ट व्हायरल :'डॉन 3' हा हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमांचक चित्रपटांपैकी एक असणार असण्याची शक्यत आहे. या चित्रपटाची वाट अनेकजण पाहात आहेत. फरहान अख्तर दिग्दर्शित 'डॉन 3'मध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असून नुकतीच या चित्रपटाची मुख्य अभिनेत्रीच नाव घोषणा करण्यात आलं आहे. 'डॉन 3'मध्ये प्रमुख भूमिकेत कियारा अडवाणी दिसणार आहे. 'डॉन 3' चित्रटामध्ये इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत असल्याची चर्चा होती. इमरान ही चर्चा फेटाळून लावल्यानंतर या चित्रपटात खलनायक कोण असेल, याबद्दल उत्सुकता निर्माण झालीय.