महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

एका व्यक्तीच्या कानशिलात लगावली, पण एल्विश यादवला ना खंत ना खेद! - एल्विश यादव कानशिलात मारली

Elvish Yadav : एल्विश यादवचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो एका व्यक्तीच्या कानशिलात मारताना दिसतोय.

Etv Bharat
एल्विश यादव

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 11:41 AM IST

Updated : Feb 12, 2024, 11:46 AM IST

मुंबई - Elvish Yadav : 'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता, प्रसिद्ध यूट्यूबर आणि गायक एल्विश यादव पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यावेळी एल्विश एका व्यक्ती कानशिलात मारताना दिसतोय. यानंतर त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून एल्विशला ट्रोल करत आहे. एल्विशचा हा व्हिडिओ जयपूरमधील एका रेस्टॉरंटमधील आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आत्तापर्यंत एल्विश यादवच्या पीआर टीमनं याबाबत कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही, मात्र एल्विश यादवची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एल्विश यादवचं वक्तव्य : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये एल्विश यादव म्हणतोय, ''मित्रांनो बघा ही गोष्ट अशी आहे की, मला भांडण करण्याचा आणि कोणावर हात उगारण्याचा शौक नाही, मी माझ्या कामाशी काम ठेवत असतो आणि सामान्यपणे वागतो. ज्यांना माझ्याबरोबर फोटो काढण्याला आवडते मी त्याच्याबरोबर फोटो काढतो. पण जर कोणी आई बहिणीवरुन शिवीगाळ करत असेल तर मी त्याला सोडणार नाही. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की माझ्याबरोबर पोलीसपण आहे आणि कमांडोही आहेत. मी काही चुकीचे केलं नाही, हे माझं व्यक्तिगत होतं. त्यानं शिवीगाळ केली आणि मी माझ्याच स्टाइलमध्ये त्याला उत्तर दिलं.' मला या गोष्टीबद्दल काही पश्चाताप नाही, मी असाच आहे.''

एल्विश यादव झाला ट्रोल :एल्विश यादव याआधी साप तस्करीमुळे चर्चेत आला होता. या प्रकरणी त्याला पोलिसांचा सामना करावा लागला होता. एल्विशचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आता काही चाहते त्याच्या ऑडिओ क्लिपवर त्याला सोशल मीडियावर समर्थन देताना दिसत आहेत. तर काहीजण त्याला वाईट आणि मुर्ख व्यक्ती असल्याचं म्हणत आहेत. एल्विश हा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो बऱ्याचदा आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यासोबत शेअर करत असतो. कधी कधी तो आपल्या चाहत्यासोबत इन्स्टा लाईव्ह करून संवाद साधत असतो.

हेही वाचा :

  1. तुम्ही कोणते चित्रपट पाहणार आहात? या आठवड्यात 'हे' ट्रेलरसह रिलीज झाले टीझर
  2. 'फर्जी' वेब सीरीजला वर्ष पूर्ण झाल्यानं शाहिद कपूरनं शेअर केली पोस्ट, चाहत्यांनी विचारला 'हा' प्रश्न
  3. 'व्हॅलेंटाईन डे'ला पती पत्नीला कोणती भेट देतात, अभिनेत्री ट्विंकल खन्नाची पोस्ट चर्चेत
Last Updated : Feb 12, 2024, 11:46 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details