मुंबई : अभिनेता विकी कौशल स्टारर 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात विकीनं मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त विकी कौशलनं रायगड किल्ल्यावर हजेरी लावली होती. आता विकीनं त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये विकीनं लिहिलं, 'आज छत्रपती शिवाजी जयंतीनिमित्त, मला रायगड किल्ल्यावर आदरांजली वाहण्याचे भाग्य लाभले. मी इथे पहिल्यांदाच आलो होतो आणि महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही. तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू.'
रायगडला दिली विकी कौशलनं भेट : शेअर केलेल्या पहिल्या फोटोत शिवाजी महाराजांच्या पुतळा असल्याचा दिसत आहे. दुसऱ्या फोटोत विकी हा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आदरांजली वाहत आहे. तसेच आणखी एका आकर्षक फोटोमध्ये विकी हा एका छोट्या मुलीची पगडी ठिक करताना दिसत आहे. तसेच शेवटच्या फोटोमध्ये विकील महाराष्ट्र सरकारच्या मंत्री आदिती तटकरे या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ही भेट देताना दिसत आहे. आता विकीच्या या पोस्टवर अनेकजण प्रेमाचा वर्षाव करत आहे. अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. याशिवाय 'छावा'मध्ये केलेलं काम हे अनेकांना आवडलं आहे. तसेच विकीच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर या कार्यक्रमामध्ये तो पारंपारिक पोशाखात असून त्यानं यावर एक पगडी परिधान केली होती. यामध्ये तो खूप सुंदर दिसत होता.
'छावा' चित्रपटाबद्दल : 'छावा' चित्रपटामध्ये निर्माते दिनेश विजन हे आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. 'छावा' चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर देखील रायगड किल्ल्यावर पोहोचले होते. याशिवाय या कार्यक्रमात विकी कौशल, लक्ष्मण उतेकर आणि आदिती तटकरे व्यतिरिक्त सुनील तटकरे आणि अनिल तटकरे हे देखील होते. तसेच विकीच्या 'छावा' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटात अक्षय खन्नानं औरंगजेबाची भूमिका साकरली आहे. याशिवाय येसूबाई यांची भूमिका रश्मिका मंदान्नानं साकारली आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
हेही वाचा :
- 'छावा'ची दक्षिण दिग्विजय मोहीम फत्ते : टॉलिवूड प्रेक्षकांची साऊथच्या भाषेत चित्रपट प्रदर्शित करण्याची मागणी, निर्माते घेणार का मोठा निर्णय?
- शिवजयंतीनिमित्त विकी कौशल जाईल रायगड किल्ल्यावर, व्हिडिओ व्हायरल...
- नागपूर थिएटरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशात 'छावा' पाहण्यासाठी पोहोचला चाहता, व्हिडिओ व्हायरल...