मुंबई - Elvish Yadav Controversy:'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता एल्विश यादवचं यूट्यूबर सागर ठाकूरबरोबर झालेल्या भांडणानंतर अनेकजण त्याला सोशल मीडियावर ट्रोल करत आहे. आता सोशल मीडियावर त्याच्या विरोधात 'अरेस्ट एल्विश' नावाचा ट्रेंडही सुरू झाला आहे. प्रत्येकजण त्याला दोषी समजत आहे. सागर ठाकूरन व्हिडीओ रिलीज केला आणि या प्रकरणी संपूर्ण माहिती सांगितली. आता यानंतर एल्विशनेही आपल्या बाजूनं संपूर्ण प्रकरणावर उजेड टाकला आहे. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून एल्विश यादवनं म्हटलं, ''सागर ठाकूरनं तुम्हाला त्याची बाजू सांगून माझ्या विरोधात केलं आहे. परंतु मी एक एक करून सर्व गोष्टी समोर आणेल. तुम्ही दोन्ही बाजूची कहाणी जाणून घ्याव्यात अशी माझी इच्छा आहे. 2020 पासून मी या सगळ्याचा सामना करत आहे. काही लोक एकत्र येत आहेत आणि माझ्या विरोधात आवाज उठवत आहेत. गेल्या 8 महिन्यांपासून मॅक्सटर्न (सागर ठाकूर ) हा मला त्रास देत आहे.''
मारपीठ केल्यानंतर एल्विश यादवनं केला व्हिडिओ जारी : एल्विशनं पुढं सांगितलं की, 'तुम्हाला सागर ठाकूरचे प्रत्येक ट्विट माझ्याविरुद्ध आढळेल. तो नेहमी मला धमकी देत असतो. जेव्हा मला तो शूटिंगदरम्यान भेटला, तेव्हा तो माझ्याबरोबर चांगला होता. मात्र त्यानंतर त्यानं मला पोक करणं सुरू केलं. यानंतर मी त्याला एकदा विचारलं होतं की, तु असं का कर आहेत, त्यानंतर तो मला अपशब्द बोलला. त्यानं मला फोटोवर म्हटलं की, तुझीच्या कुटुंबाला जाळून टाकेल. त्यानंतर मला राग आला. मी मॅक्सटर्नला विचारलं की तुझ लोकेशन दे मी तुला भेटायला येतो. त्यानंतर मी तिथे गेलो. सागर तिथे एकटा नव्हता, त्याच्याबरोबर आणखी चार जण होते. त्याच्या कुठल्याचं मित्रांनी त्याला वाचविले नाही. मात्र माझ्याबरोबर असणार लोकच मला अडवून त्याला मारू नको असं मला म्हणत होते.