महाराष्ट्र

maharashtra

Ed Sheeran : एड शीरनचे अरमान मलिक आणि आयुष्मानबरोबरच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 2:44 PM IST

Ed Sheeran : हॉलिवूड गायक एड शीरननं अल्लू अर्जुनच्या 'बोट्टा बोम्मा' या गाण्यावर अरमान मलिकबरोबर डान्स केला. याशिवाय आयुष्मान खुरानानं देखील एडची भेट घेतली आहे.

Ed Sheeran
एड शीरन

मुंबई - Ed Sheeran : हॉलिवूड गायक एड शीरन सध्या आपल्या भारत सहलीचा आनंद घेत आहे. भारतात तो त्याच्या कॉन्सर्ट टूरवर आला असून यादरम्यान त्यानं शालेय विद्यार्थ्यांचीही भेट घेतली आणि त्यांना त्याची गाणी ऐकवली. या क्षणाचा व्हिडिओ एड शीरननेही त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, ''आज सकाळी मुंबईतील एका शाळेला भेट दिली आणि मुलांसाठी परफॉर्मन्स दिल्यानंतर मला खूप मजा आली. भारतात परत आल्यावर खूप छान वाटलं. व्हिडिओमध्ये, त्यानं गिटार वाजवत आणि 'शेप ऑफ यू' गाणं गायलं आहे.

अरमान मलिक शेअर केली पोस्ट :गायक एड शीरनचा एक सुंदर व्हिडिओ आज, बुधवारी, 13 मार्च रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत एड शीरन साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा सुपरहिट चित्रपट 'आला वैकुंठपुरमुलू'मधील 'बोट्टा बोम्मा' गाण्यावर भारतीय गायक अरमान मलिकबरोबर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ अरमान देखील त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अरमान मलिक गाणं गात एड शीरनबरोबर 'बोट्टा बोम्मा' गाण्यावर थिरकत आहे. व्हिडिओत एड शीरननं पांढऱ्या टी-शर्टवर काळी पॅन्ट घातलेली आहे. याशिवाय दुसरीकडे अरमाननं काळ्या पॅन्टवर ग्रे हुडी घातली आहे. अरमाननं हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं, ''माझा आवडता व्यक्ती माझ्या शहरात.''

एड शीरनचा कॉन्सर्ट भारतात कधी होणार? : याशिवाय अभिनेता-गायक आयुष्मान खुरानानं देखील एड शीरनबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये दोघेही फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये आयुष्माननं लिहिलं, ''एडबरोबर घालवलेल्या वेळेच्या आठवणींचा पोलरॉइड. एड शीरनला भेटून आनंद झाला.'' एड शीरन सध्या आशिया आणि युरोपच्या दौऱ्यावर आहे. एडचा कॉन्सर्ट 16 मार्च रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर होणार आहे. या दौऱ्यानंतर एड शीरन आपल्या घरी परतणार आहे. एड शीरनचं भारतात आगमन झाल्यानंतर त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं होत. आतापर्यत भारतामध्ये एड शीरननं अनेक ठिकाणी भेट दिली आहे. वितमातळावर पापाराझीनं देखील एडचे फोटो क्लिक केले होते.

हेही वाचा :

  1. War 2 viral pics : 'वॉर 2'च्या सेटवरील हृतिक रोशनचे फोटो लीक
  2. Margaon Express : "ते माझ्या हृदयाच्या जवळचे लोकेशन होते": 'मडगाव एक्स्प्रेस' गोव्यातच का शूट केले याचा कुणाल खेमूने केला खुलासा
  3. Pulkit Kriti Wedding Details: पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा अडकणार लग्नबेडीत; पाहा लग्नामधील विधीचा तपशील

ABOUT THE AUTHOR

...view details